मी मुख्यमंत्रीनशी बोलतो - मा.ना.हरिभाऊ बागडे औरंगाबाद
- CT INDIA NEWS

- Sep 29, 2019
- 1 min read

औरंगाबाद :-वार्ताहार-सचिन चौधरी तेली समाजाचे नेते तथा भारतीय जनता पार्टी.प्रदेश कार्यकरणी सदस्य अनिलभैय्या मकरिये यांना औरंगाबाद (संभाजीगर) मध्ये विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी तेली सेनेच्या वतीने आज सकाळी विधानसभा अध्यक्ष मा.ना.हरीभाऊ बागडे (नाना) यांना निवेदन देऊन करण्यात आली.सदरील निवेदनात म्हटलं आहे की तेली समाजाचे नेते तथा भारतीय जनता पार्टी.प्रदेश कार्यकरणी सदस्य अनिलभैय्या मकरिये हे सर्व जाती धर्मात मिसळणारे नेते आहे.त्यांना सर्व जाती धर्मात मानणारे वर्ग मोठा आहे.अनिल मकरिये यांनी 1984 पासून पक्षाचे कार्य निष्ठेने केलेले आहे.गोरगरीबांचे प्रशन ते समजून घेत आलेले आहे.मध्य विधानसभा मदतदार संघात तेली समाजाची संख्या प्रचंड आहे.त्यांना उमेदवारी दिल्यास ते सहज बहुमतांने निवडून येऊ शकतात.तरी आपण अनिलभैय्या मकरिये यांना उमेदवारी मिळवून दयावी अशी मागणी विधानसभा अध्यक्ष तथा भाजपाचे जेष्ठ नेते आदरणीय हरीभाऊ बागडे (नाना) यांच्या कडे करण्यात आली.या वेळी मा.ना.हरीभाऊ बागडे नाना म्हणाले की अनिल मकरिये यांच्या योगदानांची जाणीव आहे.अनिल मकरिये हे एक निष्ठांवत,एक विचारशील,एक संघर्षप्रिय व्यक्ती आहे.तुमची मागणी योग्यच आहे.या संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतो.असा शब्द आदरणीय हरीभाऊ बागडे नानांनी तेली समाजाच्या शिष्ठ मंडळास दिला.या प्रसंगी तेली समाजाचे जेष्ठ समाज सेवक शंकर चौथे,महेंद्र महाकाळ,सौ.लक्ष्मीताई महाकाळ.जगदिश नांदरकर,राजु मगर,सुनिल क्षीरसागर,अनिल क्षीरसागर,प्रविण वाघलव्हाळे,गजेंद्र तोंडे.गणेश पवार,यांची उपस्थिती होती.दि.25/9/2019 रोजी सकाळी तेली समाजाचे जेष्ठ नेते विश्वानाथ गवळी (मामा) कूष्णा ठोंबरे (अण्णा) यांनीही बागडे नांनाची भेट घेऊन अनिल मकरिये यांना उमेदवारी Of दिल्यास ते सहज निवडून येतील संपुर्ण तेली समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.तरी आपण या बाबत पुढाकार घेऊन उमेदवारी मिळवून दयावी अशी विनंती केली होती.त्या अनुषंगांने आज तेली सेने निवेदन दिले आहे.







Comments