top of page

मारुती सुझुकीने तीन हजार कर्मचाऱ्यांना दिले नारळ

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Aug 23, 2019
  • 1 min read

ree

मुंबई :- (वृत्तसंस्था)ऑटो इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मंदी असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांआधी महिंद्रा अँँड महिंद्रा ऑटोमोबाईलने १००० कर्मचारयांना कामावरून कमी केले होते. अगदी कालच नामांकित बिस्कीट कंपनी पारले जी १०००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.ऑटो सेक्टरमध्ये असलेल्या मंदीचा परिणाम आता नोकऱ्यांवर दिसू लागला आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडिया कंपनीत काम करणाऱ्या ३००० कंत्राटी कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. या संदर्भातील माहिती कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.कंपनीचे चेअरमन आरसी भार्गव यांनी सांगितले की, ऑटो सेक्टरमध्ये सुरू असलेल्या मंदीमुळे कंपनीत कंत्राटी (टेम्पररी) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कंत्राट पुन्हा नुतनीकरण केले नाहीये. मात्र, याचा कुठलाही परिणाम कायमस्वरूपी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर झालेला नाहीये.एका टीव्ही चॅनलसोबत बोलताना आरसी भार्गव यांनी सांगितले की, “हा व्यापाराचाच एक भाग आहे. जेव्हा मागणी जास्त होती तेव्हा अधिक कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले जाते. तर जेव्हा मागणी कमी होते तेव्हा या कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली जाते”. सध्याच्या काळात ऑटो सेक्टरमध्ये स्लो डाऊनचा परिणाम मारुतीवर झाला असल्याच्या बाबतीत बोलताना भार्गव यांनी ही माहिती दिली आहे.आरसी भार्गव यांनी पुढे म्हटलं की, मारुती सुझुकी कंपनीत काम करणाऱ्या जवळपास ३००० कंत्राटी कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये स्लो डाउन, सेल, सेवा, वित्त इत्यादी विषयांवर बोलताना भार्गव यांनी म्हटलं, ऑटोमोबाइलच्या सेलमध्ये कमी विक्रीचा सर्वाधिक परिणाम हा नोकऱ्यांवर पडतो.ऑटोमोबाइल सेक्टर गेल्या दोन दशकांपासून खूपच वाईट परिस्थितीतून जात आहे. त्यामुळेच अनेक नागरिकांच्या नोकरीवर संकट निर्माण झाले आहे. गाड्यांची मागणी कमी झाल्याने ऑटो सेक्टरमध्ये असलेल्या मंदीमुळे अनेक कंपन्यांना आपल्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स बंद करावे लागले आहेत. कंपन्यांना अपेक्षा आहे की, येत्या काळात फेस्टिव सीझनमध्ये कदाचित गाड्यांची मागणी वाढू शकते. गेल्या नऊ महिन्यांत वाहनांच्या विक्रीत मोठी घसरण झाल्याचं दिसत आहे. गेल्या महिन्यात वाहनांच्या विक्रीत १८.७ टक्क्यांनी घसरण झाली आहे.

Comments


bottom of page