मावळा प्रतिष्ठान संचालित शेतकरी , कष्टकरी आणि मजुर
- CT India News
- Feb 20, 2021
- 1 min read
लासुर स्टेशन CT INDIA NEWS प्रतिनिधी मनीष मुथा
लासुरला पत्रकार सेवा संघाच्यातीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन....
मराठी पत्रकारितेचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आद्य जनक.....बाजार समितीचे संचालक सुनील पाखरे
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली लासूर स्टेशन येथील पत्रकार फिरोज मंसुरी यांच्या संपर्क कार्यालयात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील पाखरे यांच्या शुभहस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करत श्रीफळ फोडण्यात आले यावेळी बोलताना श्री.पाखरे म्हणाले की मराठी पत्रकारितेचे खरे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर असून दर्पणच्या माध्यमातून खरी पत्रकारिता काय असते व सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संस्था,संघटना,व्यक्ती यांच्यासाठी पत्रकार म्हणजे एक शक्ती आहे मात्र ती पत्रकारिता निस्वार्थ असायला हवी असेही पाखरे यांनी सांगितले.
दरम्यान यावेळी महाराष्ट्र पत्रकार सेवा संघाचे तालुकाउपाद्यक्ष गुलाब पाटील वाघ,तालुका सरचिटणीस फिरोज भाई मंसुरी,तालुका सद्यस्य मनीष मुथा, दैनिक देशोउन्नतीचे पत्रकार खलील शहा, बाजार सIमितीचे संचालक सुनील पाखरे,महाराष्ट्र पत्रकार सेवा संघाचे सल्लागार पत्रकार संजयजी शर्मा आदींची उपस्थिती प्रामुख्याने होती.









Comments