मध्ये 12 जणांच्या टोळीने बेकायदेशीर सावकार
- CT India News
- Dec 27, 2021
- 2 min read
इस्लामपूर (प्रतिनिधी) : *सचिन माळी*
*हेडिंग* : इस्लामपूर मध्ये 12 जणांच्या टोळीने बेकायदेशीर सावकारी करत एका कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. या टोळी विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून यातील चौघा जणांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश येथील न्यायालयाने दिले आहेत .या सावकारांच्या विरोधात बाजीराव दिनकर पाटील रा. इस्लामपूर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
बाजीराव पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे.बालम हनिफ जमादार रा.पेठ ,हिंदुराव बबन मोरे रा. कापुसखेड ,संभाजी शिवाजी पवार रा. इस्लामपूर या तिघांशिवाय सांगली येथील तिघेजण व्यापारी तसेच वाळवा येथील पवार नामक व्यक्ती तसेच जगन्नाथ किसन चिखले (नवेखेड), सुजित पाटील (इस्लामपूर), धैर्यशील संताजीराव पाटील रा. (कामेरी) , ज्ञानदेव जाधव (सातवे), पवार यांच्यासह तीन व्यापारी आणि एक कापड दुकानदार अशा १२ जणांच्या टोळीने बेकायदेशीर सावकारी चालू केली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, वरील सर्व संशयितांनी आपला गट करून बाजीराव पाटील यांना ऑक्टोबर २०२० ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत ठरावीक सावकारी व्याजाने २२ लाख ९० हजार रुपये दिले होते. यातील संभाजी पवार याच्याकडून ९० हजार रुपये घेतले होते. त्याला व्याजापोटी ७२ हजार ४०० रुपये देऊनही त्याने पाटील यांची दुचाकी जबरदस्तीने काढून घेतली आहे. तर, ज्ञानदेव जाधव याला ३ लाखापोटी १ लाख १४ हजार रुपये व्याज दिले. मात्र आणखी ३ लाख ६० हजार रुपयांची मागणी होत होती. या सर्व प्रकारात या सावकारांनी वेळोवेळी घरी येऊन आणि मोबाईल फोनवरून ९५ लाखांच्या रकमेची मागणी करत संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार हे जिल्हा परिषद विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीस आहेत. या सावकारांच्या विरोधात लूटमार आणि खासगी सावकारी प्रतिबंधक कायद्याखाली
गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील बालम जमादार, हिंदुराव मोरे, संभाजी पवार,धैर्यशील पाटील, यांना पोलिसांनी अटक केली आहे . इतरांचा पोलीस शोध घेत आहेत.यातील खाजगी सावकार यांच्या विरोधात कोणाची तक्रार असेल तर इस्लामपूर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
संपर्क CT INDIA NEWS
*कार्यकारी संपादक*
*तुकाराम सुतार सर*
*9604007344* www.ctindiatv.com
🔷 *नम्र आवाहन*🔷
*आपणाकडे कोणत्याही शासकीय-निमशासकीय कार्यालयात चुकीच्या मार्गाने पैशाची मागणी करीत असेल किंवा त्यामुळे आपले काम थांबवत असेल तर त्वरीत लाच- लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधा. किंवा विनामुल्य सहकार्य व मार्गदर्शनासाठी CT INDIA NEWS संपादक श्री गणेश चौधरी सर यांच्याशी 8329897617 या क्रमांकावर संपर्क साधा*









Comments