महापौर गीता ताई सुतार यांचा प्रभाग निहाय फिरती व उपाययोजना बाबत आढावा..
- CT INDIA NEWS

- Apr 8, 2020
- 1 min read

वार्ताहर-तुकाराम सुतार- सांगली--Covid – 19 नोव्हेल कोरोना व्हाइरस प्रादुर्भाव रोखणेसाठी महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग निहाय फिरती व उपाययोजनांबाबत आढावा. सांगली महानगरपालिका महापौर सौ गीता ताई सुतार दिनांक - 6 ऐप्रिल, 2020 रोजी प्रभाग समिती क्र. 3 अंतर्गत वॉर्ड क्र. 1, 2 व 8 मधील सन्मा. सदस्या मदिना इलाई बारुदवाले सभापती प्र. स. क्र. 3, सन्मा. सदस्य श्री शेडजी मोहिते, विश्वू माने, श्री प्रकाश ढंग, श्री गजानन मगदूम, सौ. कल्पना कोळेकर, श्री प्रशांत पाटील तसेच सन्मा. सदस्य श्री संतोष पाटील व श्री पराग कोडगुले, सहा. आयुक्त प्र. स. 3 सा.मि.कु.शहर महानगरपालिका यांचे समवेत कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखणेसाठी उपाय योजनांबाबत बैठक घेणेत आली. प्रथम श्री कोडगुले, सहा. आयुक्त मनपा यांचा कडून माहिती घेणेत आली. श्री कोडगुले यांनी ब्लेज इंडिया या संस्थेतर्फे तमिळनाडू येथील अडकलेले 650 लोकांचे दोन वेळच्या जेवणाची व निवा-याची सोय करणेत आली आहे. तसेच श्री नितेश गिडवाणी यांनी बाहेरील विदयार्थी, मजूर असे एकूण 150 लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करणेत आली आहे. तसेच बेथील नगर- 70 लोक, समता नगर- 50 लोक, रामकृष्ण नगर – 200 लोक यांनाही दोन वेळचे जेवण पोहोच करणेची सोय करणेत आली आहे. सन्मा. सदस्या कल्पना कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मधुसूदन डेअरी तर्फे गरजू नागरीकांना दुध पाकीटे वितरीत करणेचे काम चालू आहे. सन्मा. सदस्य श्री विष्णू माने यांचेतर्फे त्यांचे भागामध्ये गरजू लोकांना 483 किट (तांदूळ, डाळ, तेल, साखर,मिठ इ.) वाटप करणेत आले. सन्मा. सदस्य श्री संतोष पाटील यांचे तर्फे 150 लोक/विदयार्थी यांचेसाठी ऑरंज FM कडून दोन वेळच्या जेवणारी सोय करणेत येत आहे. तसेच भागातील गरजू लोकांसाठी व्यक्तीश: फूड पॅकेट तयार करुन वाटणेचे काम ही ते करीत आहेत.







Comments