top of page

महाभ्रष्टाचारी तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. एम.डी.चव्हाण त्यांच्यावर अखेर कारवाईचा दणक

  • Writer: CT India News
    CT India News
  • May 25, 2021
  • 1 min read

ree

महाभ्रष्टाचारी तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. एम.डी.चव्हाण त्यांच्यावर अखेर कारवाईचा दणका


गौताळा अभयारण्यातील पाटणादेवी परिसरात जिवंत झाडांची संगनमताने कत्तल करून विक्री केल्या बाबतची पुऱ्याव सकट क्राईम अँड करपशन कंट्रोल असोसिएशन यांनी प्रधान मुख्य वन्यजीव संरक्षक श्री.नितीन काकोडकर नागपूर महाराष्ट्र राज्य आणि मा श्री. सूनिल लिमये अपर प्रधान मुख्य वन्यजीव संरक्षक पश्चिम विभाग मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या कडे केली होती.सदर तक्रारीची गांभीर्याने दखल घेत वन्यजीव अधिनियम १९२७ आणि वन्यजीव सरंक्षण कायदा  १९७२ नुसार मा.श्री .विजय सातपुते विभागीय वनाधिकारी वन्यजीव औरंगाबाद यांनी सदर तक्रारीची चौकशी करण्यासाठी ५ सदस्यांची चौकशी समिती गठीत केली. या चौकशी समितीने प्रधिर्ग चौकशी करून तात्काळ संबंधित वनपाल,वनराक्षक, वनमजुर याना निलंबित केले तसेच यातील प्रमुख संशयित तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.एम डी चव्हाण  यांच्या वर विभागीय वनाधिकारी यांच्याकडील दिनांक १०/०५/२०२१ पत्र क्रं विवीअ/वजीऔ/तक्रार/प्र क्र २० (२० - २१) / २२१ / २०-२१ नुसार महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) १९७९ च्या नियम ८ अंतर्गत विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून अन्वेय संबंधित अधिकाऱ्यांना दोषारोपपत्र बजावण्यात आले आहे.असे आम्हला मा श्री विजय सातपुते विभागीय वनाधिकारी वन्यजीव औरंगाबाद यांनी लेखी पत्रा द्वारे कळवीले आहे.

             संबंधित वरिष्ठ वनाधिकारी यांनी आमच्या लेखी तक्रारीची दाखल घेत केलेल्या कठोर कारवाई बद्दल आमच्या क्राईम अँड करपशन कंट्रोल असोसिएशन तर्फे  मनापासून आभार मानतो. तसेच तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी  श्री एम डी चव्हाण यांची वेळेत चौकशी करून कठोर कारवाई केली जावी. यांच्या कार्यकाळातील गौताळा अभयारण्य पाटणादेवी परिसराचे झालेले नुकसान कधीही भरून न येणारे असले तरी या कारवाई मूळे भविष्यातील संभाव्य आश्या स्वरूपांच्या गुन्ह्याला नक्कीच आळा बसेल याची आम्हाला खात्री आहे.

Comments


bottom of page