महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणारा नाही:- शरद पवार
- CT INDIA NEWS
- Oct 16, 2019
- 2 min read

वार्ताहार-संतोष महाले-शेंदुर्णी महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही - शरद पवार पद्मभूषण देणारे विचारता की मी काय केलं कुस्ती खेळायला समोर कोणी नाही. आम्ही मातीतील कुस्तीगिर आम्ही कुस्तीगीरसोबतच कुस्ती खेळतो तुम्ही तसे पहिलवान नाही. तुमच्यासोबत काय कुस्ती खेळायची असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना शेंदुर्णी येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस कावळे गट आघाडी चे अधिकृत उमेदवार संजय गरुड यांच्या प्रचारांत सभेत मारला. यावेळी बोलताना ते म्हणाले बँकेच्या कधी माझी संचालकांवर ईडीची चौकशी लावल्या गेली. मी त्या बँकेच्या संचालक काय सभासद सुद्धा कधी नव्हतो कारण काय तर म्हणे शिखर बँकेचे लोक माझ्या ओळखीचे आहेत. म्हणून माझे नाव त्यात टाकण्यात आले, माझ्यावर इडी लावण्यात आली. पण मी स्वतःईडी जाणे पसंत केले मग मात्र त्यांचे धाबे दणाणले एक मात्र निश्चित महाराष्ट्र दिल्लीच्या तत्वा पुढे कधीच झुकणार नाही. समोर सक्षम विरोधक दिसत नसल्याचे भाजपाचे नेते सांगतात मग मोदीच्या दहा सभा शहराच्या विसावा फडणीसांच्या 100 सभेचे नियोजन कसे करता असा प्रश्नही त्यांनी त्यावेळी केला. महाराष्ट्रातील तरुण मंडळींनी ही निवडणूक हाती घेतली आहे. त्यांची अशी अवस्था झाली आहे. 370 कलम रद्द केल्याच्या वल्गना करणाऱ्यांना माझे आव्हान आहे. अजून चार राज्यात 371 कलम मुळे इतर राज्यातील लोकांना जागा विकत घेता येत नाही. ते कलम रद्द करा 370कलम व्यतिरिक्त या निवडणुकीत सत्ताधारी जवळ दुसरा मुद्दा नाही. खरे तर महाराष्ट्र समोर शेतकऱ्यांचे प्रश्न अजून उभे आहे. महाराष्ट्राची अस्मिता शिवरायांचा पुतळा समुद्रात उभारणार होते त्याचे काय झाले असाही प्रश्न त्यांनी त्यावेळी उपस्थित केला सत्तेचा वापर माणसं मारायला नको तर माणसं वाढवायला झाला पाहिजे, मनमोहन सिंग पंतप्रधान पदावर असताना त्यांचा विनम्रपणा अख्ख्या जगाने पाहिला आहे बुडीत बँकांना वाचवण्यासाठी केंद्रशासन 70 हजार कोटी रुपये देते, मात्र आत्मग्रस्त शेतकरी कुटुंबीयांसाठी कोणतीही आर्थिक तरतूद नसल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीचे गाजर शेतकऱ्यांना दिले मी तुम्हाला विनंती करण्यासाठी आलो आहे.
Commentaires