"महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानच्या जिल्हा कार्यकारिणी ची निवड"
- CT INDIA NEWS

- Sep 9, 2019
- 1 min read

वार्ताहर- संदीप इंगळे सोयगाव...मुस्लिम तसेच इतर समाज घटकांतील जनतेच्या न्याय्य हक्क व अधिकारांसाठी लढणारी सामाजिक संघटना महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानच्या औरंगाबाद जिल्हा कार्यकारिणी ची निवड संस्थापक अध्यक्ष अज़हर भाई शेख साहेब यांच्या निर्देशानुसार प्रदेश उपाध्यक्ष रियाज खान साहेब, प्रदेश संघटक अहमद अंसारी साहेब यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष इस्माइल शेख यांनी केली. याप्रसंगी ऍड. शेख उस्मान आणि ऍड. सय्यद रिजवान साहेब यांची जिल्हा विधि सल्लागार म्हणून तर सय्यद तौसीफ यांची जिल्हा प्रवक्तेपदी तसेच सिल्लोड तालुका संघटक पदी शेख शकील बोरगांवकर यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष इस्माइल शेख यांनी केली. कार्यक्रमास सिल्लोड तालुकाध्यक्ष इसरार खान, तालुका उपाध्यक्ष अब्दुल रहमान शेख, तालुका महासचिव हबीबखान पठाण, तालुका सचिव अक्रम पठाण, दैनिक भास्कर चे ज्येष्ठ पत्रकार बशीर पठाण साहेब,समाजसेवक शेख मुख्तार साहेब, शेख सादेक़ मॅकेनिक, शेख खलिल, पठाण फ़िरोज़ खान यांची लक्षणीय उपस्थिती होती. याप्रसंगी पदाधिकारी व उपस्थित जनसमुदायाला जिल्हाध्यक्ष शेख इस्माईल यांनी मार्गदर्शन केले व संघटनेच्या ध्येयधोरणांची माहिती दिली. कार्यक्रमात हबीबखान पठाण, अक्रम पठाण यांनीही मनोगत व्यक्त केले. नवनियुक्त पदाधिकार्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यकमाची राष्ट्रगीताने यशस्वी सांगता झाली.







Comments