महाराष्ट्र संगणक परीचालक संघटनेचे धरणे आंदोलन.
- CT INDIA NEWS

- Aug 31, 2019
- 1 min read

सोयगाव :- प्रतिनिधी संदीप इंगळे आय टी कंपनीत सामावून घेऊन पगारवाढ व्हावी आणि इतर मागण्यांसाठी सोयगाव तालुका संगणक परिचालक संघटनेतर्फे पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संगणक परीचालकांचे थकीत वेतन देण्यात यावे, विविध योजनांचे कामं करून देखील आतापर्यंत त्याचे मानधन मिळाले नाही.तसेच नेमून दिलेली कंपनी मोठ्या प्रमाणावर संगणक परीचालकांची पगार कपात करीत आहे.वेळेवर पगार होत नाही त्यामुळे संगणक परीचालक मेटाकुटिस आले आहेत.या आधी संबधित विभागाच्या मंत्र्यांतर्फे आय टी कंपनीत सामाउन घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु दिलेले आश्वासन शासन कर्ते विसरले या साठी शासनास जाग आणण्यासाठी संगणक परीचालक संघटनेतर्फे धरणे आंदोलन करीत असल्याचे संघटनेचे ता. अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी सायकाळी गटविकास अधिकारी ज्योती कवाडदिवे यांनी आदोलण कर्तेना भेट देऊन पंचायत समिती स्थारावरील प्रश्न तातडीने सोडविण्यात येईल असे लेखी पत्र दिले. यावेळी कैलास जाधव, धर्मराज पाटील, हेमंत गावंडे, अमोल रावलकर, अनिल शेळके आदींची उपस्थिती होती.







Comments