महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच लाभार्थी मेळावा व 120 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ
- CT India News
- Feb 20, 2022
- 2 min read
महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच लाभार्थी मेळावा व 120 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ
जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे - आ. प्रशांत बंब यांचे आवाहन.
लासुर स्टेशन/ प्रतिनिधी : मनीष मुथा
गंगापूर - खुलताबाद तालुक्यातील विविध शासकीय योजनाचे वितरण व वैयक्तिक लाभाच्या योजना लाभार्थ्यांना वाटपाचा तसेच दोन्ही तालुक्यातील दोन हजार महिलांना मशरूम उद्योगासाठी अर्थसाह्य,महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी व लाभार्थी मेळावा व 120 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रम सोमवारी (दि 21) रोजी लासुर स्टेशन येथील मार्केट यार्डासमोरील गीताबन या ठिकाणी होणार असून दोन्ही तालुक्यातील लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार प्रशांत बंब यांनी केले आहे.
आमदार प्रशांत बंब व आरित सेवाभावी फाउंडेशनच्या मार्फत मागील सहा महिन्यांपासून गंगापूर - खुलताबाद तालुक्यातील विविध गावात घरोघरी जाऊन नागरिकांकडून विविध शासकीय योजणांचे तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अर्ज भरून घेतले. त्यात कामगार कल्याण योजने अंतर्गत मजुरांना पेटी वाटप, ई - श्रम कार्ड वाटप, गाव वस्त्यातील मुला - मुलींना सायकल वाटप, दारिद्य्र रेषेखालील लाभार्थ्यांना कार्ड वाटप, गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप, दिव्यांगाणा तीनचाकी सायकल वाटप होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील महिलांना स्वयं रोजगार करता यावा व त्यांनीही आत्मनिर्भर होऊन व्यवसायिक व्हावे या उद्देशाने त्याच्यासाठी मशरूम उत्पादन व प्रदर्शन तसेच त्या संबंधी माहिती देण्यात येणार असून दोन हजार महिलांना अर्थसहाय्य, त्याच बरोबर महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच लाभार्थी मेळावा व 120 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ
देखील करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे राहणार असून उदघाटक म्हणून केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांची उपस्थित असणार आहे. त्याच बरोबर
नाफेडचे व्यवस्थापक आणि नाबार्ड बँकेचे केंद्रीय व्यवस्थापक या कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी कोरोना व ओमीक्रोनचे नियंमाचे पालन करून तोंडाला मास्क लावून उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार प्रशांत बंब यांनी केले आहे.









Comments