top of page

महिला मुक्तीसंग्राम महिला मुक्तीसंग्राम

  • Writer: CT India News
    CT India News
  • Jan 2, 2021
  • 3 min read

महिला मुक्ती संग्राम

महिला मुक्ती संग्राम

१९७० नंतरच्या कालखंडात महिलांच्या विविध सोडवणूक करण्यासाठी विविध राजकीय संघटना बांधनी करण्यात आली त्यात समाजवादी महिलांचा सहभाग जास्त होता हैदराबाद १९७५ मध्ये प्रागतिक महिला संघटना स्थापन झाल्या त्यातच औरंगाबाद येथे महिला समता संघटना स्थापन केली

पहिल्या संघटनेने महिला समाजातील गौण स्थानाबधदल मांडलेला विरुद्ध प्रभाव दिसून येतो दुसर्या संघटनेने महिला स्वातंत्र्य याचा पुरस्कार केला आणि होणा-या भेदभावाबधदल विशेष टिका केली आहे

आणीबाणीच्या काळात १९७५ /७७ देशातील महिला संघटना मध्ये वैचारिक मंथन चालू झाले आणीबाणी नंतर अनेक महिला संघटना स्थापन झाल्या त्यांचे कार्य प्रामुख्याने मुंबई. दिल्ली. मद्रास. पुणे. पाटणा. अहमदाबाद. या मोठ्या नगरामधये स्थापन झाल्या या संघटना मध्ये सुशिक्षित. मध्यमवर्गीय. महिला चा समावेश होता महिला संघटना यानी आपल्या अडचणी दूर करण्यासाठी व विविध प्रश्नांसाठी लढे उभारले व आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी कामगार संघटना व क्रांतिकारी संघटना यांच्याशी हातमिळवणी करावी व आपले कार्य करावे याबाबत दुमत तयार होण्यास सुरुवात झाली. १९७८ समाजवादी विचारांचा व महिला पुरस्कार करणाऱ्या महिलांची पहिली परिषद भरली

१९७९/८० हुंडाबळी व पोलिसांच्या कडून होणारे अत्याचार यांबाबत चळवळी सुरू झाल्या घरकाम करणाऱ्या महिला तसेच झोपडपट्टी रहिवासी महिला यांना संघटित करण्याचे काम सुरू झाले हुंडाबळी व पोलिसांच्या अत्याचाराबाबत कितीही आवाज उठवला तरी न्यायालयात ह्या गोष्टी सिध्द करणे अवघड असते असे महिला संघटना यांच्या लक्षात आले

मोर्चे. निदर्शने. सभा नेहमीच्या प्रचार प्रसार तंत्रासोबत महिला संघटना यांनी कलापथक. पथनाट्य कलापथक इत्यादी माध्यमांतून प्रभाविपणे उपयोग केला महाराष्ट्र मधील महिला संघटना यांनी. मुलगी झाली हो. सारख्या मुकतनाटयादवारे महाराष्ट्र मधील महिलांचे लक्ष वेधले समाजवादी व साम्यवादी विचारांच्या महिलांनी महागाई विरोधात आघाडी उघडून मुंबई मध्ये वारंवार निदर्शनं केली महागाई मुळें व जीवनावश्यक वस्तू टंचाई मुळे महिलांना कसा त्रास होतो यांकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले

१९८५ मध्ये शहाबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला मुस्लिम महिलांना पोटगी हक्कांबद्दलचा ऐतिहासिक निर्णय रद्द करण्यासाठी सरकारने कायद्यात सुधारणा दुरूस्ती घडवूनी आणली त्याची भीषण तीव्रता महिला संघटना मध्ये उमटली तसेच. १९८७ राजस्थानातील देवराला याठिकाणी सती प्रथेविरुधद आवाज उठवला

भारतातील महिलांच्या संसद बाह्य राजकीय संघटना अशा प्रकारें कार्य करीत असताना ग्रामीण भागातील तसेच निरक्षर महिला अद्यापी अशा विविध महिला हिताचा विचार करणार्या संघटना पासून लांब आहेत जोपर्यंत बहुसंख्य महिलांना या संघटना व आपणाकडे आकर्षित करू शकत नाहीत तोपर्यंत कुटुंब नियोजन महिला शिक्षन आरोग्य यासंबंधीची त्यांच्या कार्याला वेग येणार नाही

वरील प्रमाणे माहिती मांडली आहे पण आज आपण म्हणतो महिला मुक्ती संग्राम साठी शासन विविध उपाययोजना शक्ति साराखा महिला अत्याचार कौटुंबिक हिंसाचार. यासाठी शक्ति साराखा कठोर कायदा तयार करण्यात आला आहे पण आजसुद्धा एक हि दिवस असा नाही की वृतमानपत्रात एकही महिला अत्याचार संबंधी बातमी नाही गरज आहे ती म्हणजे राजमाता जिजाऊ. रानी लक्ष्मीबाई. सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर इंदिरा गांधी मदर तेरेसा. ह्या निर्भिड महिला ज्या मातीमध्ये जन्माला आल्या आपण सुध्दा त्यांच्या लेकी आहात आपल्या हकक व अधिकार यासाठी लढा द्यावा अन्याय करणार्या पेक्षा तो सहन करणारा मोठा अपराधी आहे महिलांना बाहेरील वागणूकी पेक्षा घरातच वागणूक व कौटुंबिक हिंसाचारापासून वाचविणे गरजेचे आहे कारण आपलीं भारतीय महिला आज घरगुती हिंसाचाराच्या विळख्यात सापडली आहे माझ्या आई बहीण यांना एक विनंती वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि नेतृत्व करा

महिला सन्मान देशाचा अभिमान

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन कृती समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

समाजसेवा व जनप्रबोधन प्रचार व प्रसार वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य येथून पदाधिकारी नेमणे आहे तरी तरूण व व्यक्ति यांनी संपर्क साधावा

ज्यांनी कोणी कालचा वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजना हा संदेश वाचला असेल तर आप आपल्या जिल्हा परिषद येथे सदर योजनेचा पाठपुरावा करा अन्यथा माहिती अधिकार दाखल करुन माहिती मागा

Comments


bottom of page