राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट लागू
- CT INDIA NEWS

- Nov 12, 2019
- 1 min read

मुंबई प्रतिनिधी । कोणताही राजकीय पक्ष सत्ता स्थापन करू न शकल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.राज्य विधानसभेच्या निकालात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. महायुतीला जनतेने एकत्रीतपणे कौल दिला असला तरी दोन्ही पक्षांमधील वाद चिघळला. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची अट ठेवली असता भाजपने याला साफ नकार दिला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी परंपरेनुसार सर्वात जास्त जागा मिळवणार्या पक्षाला म्हणजेच भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी पाचारण केले. मात्र त्यांनी यासाठी असमर्थता दर्शविली. यानंतर शिवसेनेला पाचारण करण्यात आले तरी त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठींबा मिळाला नाही. यानंतर राष्ट्रवादीला आमंत्रीत करण्यात आले तरी त्यांच्याकडूनही सरकार स्थापनेसाठी हालचाली होत नसल्याने आज दुपारी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्यात आली. तर संध्याकाळी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. यामुळे आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे राज्याची सर्व सूत्रे गेली आहेत. ते प्रशासकीय प्रमुख म्हणून राज्याचा कारभार पाहतील.







Comments