राज्यस्तरीय सिल्वर मेडल विजेता शैल्य रत्नपारखी
- CT INDIA NEWS
- Oct 18, 2019
- 1 min read

वार्ताहर:- मनीष मुथा साहेबराव पाटील डोणगावकर पब्लिक स्कूल धामोरी तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा विद्यार्थी शैल्य शशिकांत रत्नपारखी याने राज्य स्तरावरही आपली कुस्ती स्पर्धेतील चमक कायम ठेवून सिल्वर मेडल जिंकले आहे. शैल्य हा पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये अंडर फोर्टीन वयोगटातील आपल्या मराठवाडा विभागाचे नेतृत्व करत होता.. या वयोगटात संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून त्याने सर्व द्वितीय येण्याचा सन्मान प्राप्त केला आहे.. रायपूर सारख्या एका खेडेगावातून ज्या ठिकाणी कुठल्याही सुयी सुविधा उपलब्ध नसताना सुद्धा मेहनत, अभ्यास, चिकाटी व जिद्द अंगीकारून शैल्यने हा सन्मान प्राप्त केला आहे... या यशाबद्दल संस्थेच्या वतीने सचिव तथा जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड. देवयानी पाटील डोणगावकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, शाळेच्या प्राचार्य विजया औताडे शाळेचे समन्वयक श्री रोकडे सर ,जाधव सर क्रीडाशिक्षक श्री गौतम मोकळे सर ........ सह सर्व शिक्षक- शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी पालक आदींनी या यशाबद्दल शैल्य चे अभिनंदन केले आहे.....
Comments