top of page

*राजनंदिनी संस्थेतर्फे दत्तात्रय तावडे यांना पुरस्कार जाहीर*

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Oct 8, 2020
  • 1 min read

ree

*राजनंदिनी संस्थेतर्फे दत्तात्रय तावडे यांना पुरस्कार जाहीर*

जळगाव- प्रतिनिधी सचिन चौधरी (महाराष्ट्र ब्युरो चिफ) राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे कळमसरा ( ता. पाचोरा) येथील गंगा नर्सरीचे संचालक दत्तात्रय तावडे यांना "पर्यावरण मित्र-2020-21" पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दि 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 वाजता कळमसरा येथील श्रीराम मंदिरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महिला आघाडीच्या प्रदेश सचिव वंदना चौधरी आणि शेंदुर्णी जिनिंगचे संचालक अशोक चौधरी यांच्या हस्ते करण्यात येईल. निसर्गप्रेमी तावडे यांनी व्रुक्षारोपण, पर्यावरण, पशु-पक्ष्यांबाबतची भूतदया आदी विषयक उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी केलेल्या सकारात्मक कार्यामुळे कळमसरा गावाच्या नावलौकीकात भर पडली. या प्रेरणादायी कामगिरीची दखल घेत दत्तात्रय तावडे या अष्टपैलू व्यक्ती, संवेदनशिल माणसाचा, मानवता आणि ग्रामसंस्कु्तीच्या पुजाऱ्याचा सन्मान होत आहे. या छोट्याखानी गौरव सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments


bottom of page