top of page

रिपाई खरात गटाच्या विध्यार्थी आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून मनपाला निवेदन

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Aug 23, 2019
  • 1 min read

ree

औरंगाबाद :-प्रतिनिधी-अमरदिप हिवराळे / औरंगाबाद शहरातील मनपाच्या शाळा बंद न करता शाळांचे पुनर्जीवन करण्यात यावे यासाठी रिपाईच्या खरात गटाच्या विद्यार्थी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्तांना आणि मालमत्ता अधिकारी मनपा यांना निवेदन दिले ,निवेदनात असे नमूद आहे की मनपा आयुक्तांनी मनपाच्या शाळेत विध्यार्थ्यांची संख्या कमी आहे. असे कारण दाखवत शाळा बंद करण्याचा सपाटा सुरू केला आहे. आणि खाजगी शाळांना मान्यता देण्यात येत आहे. आणि जाणूनबुजून खाजगी शाळांच्या फायद्याच विचार असे करणे म्हणजे गरिबांच्या मुलामुलींच्या भवितव्याशी खेळण्यासारखे आहे. जर असे झाले तर गरिब, वंचित मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांच्या पाल्यांना शिक्षण घेणे शक्य होणार नाही. तरी संबंधित अधिकारी व प्रशासकीय अधिकारी, मालमत्ता अधिकारी यांनी विचार विनिमय करून मनपाच्या शाळांचा विकसित करून आणि सोयीसुविधा दिल्या तर मनपा शाळेतील विध्यार्थ्यांची संख्या वाढेल आणि पर्यायाने गोरगरीब विध्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करणे शक्य होईल. असे अनेक मुद्दे या निवेदनात आहे, यासाठी मनीष नरवडे(जिल्हाध्यक्ष, विध्यार्थी आघाडी), गणेश साळवे(जिल्हाध्यक्ष), रवी भावले(शहराध्यक्ष पूर्व,औरंगाबाद) आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments


bottom of page