राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी निवड जिल्हाध्यक्ष यांच्या हातुन देण्यात आले
- CT INDIA NEWS

- Jul 30, 2020
- 1 min read

प्रतिनिधी-गणेश चौधरी- धुळे-
राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची निवड ; जिल्हाध्यक्षाच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र
धुळे - नुकतीच राज्यस्तरीय राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली असून देशाचे नेते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या प्रेरणेतून, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या आदेशान्वये राज्यभरात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत.
धुळे जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा ज्योती ताई पावरा, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी हिमानी ताई वाघ, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा प्राजक्ता देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज धुळे जिल्हा युवती कार्यकारिणीतील नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यात युवती तालुकाध्यक्षा क्रांती साळुंखे, शहराध्यक्ष रुपाली झाल्टे तसेच जिल्हा कार्याध्यक्ष पदी अंजली पवार तर जिल्हा उपाध्यक्ष पदी स्वानंदी बेडसे यांची निवड करण्यात आली.







Comments