रस्त्यासाठी शेतकरी घेणार जलस्वराज्याच्या कामात जलसमाधी
- CT INDIA NEWS

- Sep 8, 2020
- 1 min read

मनोज मुथा लासुर
*रस्त्यासाठी शेतकरी घेणार जलस्वराज्यच्या कामात जलसमाधी.....*
गंगापूर तालुक्यातील सावंगी येथील मार्तंडी नदीचे खोलीकरण व रुंदिकरण गेल्या तीन वर्षीभरापूर्वी जानकी देवी बजाज संस्थेने केले होते परंतु नदीचे खोलीकरण झाल्यानंतर नदीच्या पलीकडिल बाजूच्या शेतकर्याना आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ताच न राहिल्याने तीन फूट पाण्यातून शाळकरी मुले,वयोवृद्ध माणसं,रुग्ण याना नदीपलिकडे शेतात व वस्तीवर जाण्या येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असून दोन दिवसांपूर्वी सुल्तानाबाद येथील राजू गायकवाड हा इसम जात असताना बुडुन मयत झाल्याने आणखी दुर्दैवी घटना लहान मुले व वयोवृद्ध यांच्याबाबत घडू नये म्हणून तहसिलदार यांनी त्वरित या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत असून जर येत्या आठ दिवसात रस्त्याचा प्रश्न निकाली लागला नाही तर याच तुंबलेल्या पाण्यात जलस्वराज्य योजनेच्या पाण्यात सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा दिला असल्याने आता महसूल प्रशासन काय करते याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान या प्रकरणात तत्कालीन तहसिलदार यांनी कलम 143 नुसार रस्ता देण्याचा आदेश पारित केला होता त्यास उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागितली असता त्यानीं गंगापुरचे तहसीलदार याना पाहणी करण्याचे आदेशीत केले होते तहसिलदार यांनी स्थळ पंचनामा केला मात्र काही निर्णय न दिल्याचा आरोपही सदर शेतकर्याणी केला असून निर्णय न झाल्यास जलसमाधी घेणार असल्याचे सांगितले.







Comments