लिटल चेम्स फेम कार्तिकी गायकवाडचा साखरपुडा संपन्न....
- CT INDIA NEWS

- Jul 30, 2020
- 1 min read

प्रतिनिधी-मीना परळकर- औरंगाबाद-
सुमधुर गळ्याची गायिका कार्तिकी गायकवाडचा काल साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. पुण्याच्या रोनित पिससोबत कार्तिकी आपलं वैवाहिक आयुष्य घालवणार आहे. रोनित हा पेशाने इंजिनिअर आहे तसंच त्यांचा स्वत:चा व्यवसाय देखील आहे.
कार्तिकीचे बाबा कल्याणजी गायकवाड यांच्या मित्रपरिवातील पिसे कुटुंब आहे. सोमवारी दुपारी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पुण्यात तिच्या साखपुड्याचा कार्यक्रम पार पडला. तसंच कार्तिकीच्या भावी आयुष्याबद्दलचा महत्त्वाचा निर्णय माझ्या बाबांनीच घेतला असल्याचं कार्तिकीने आवर्जून सांगितलं आहे.
आपल्या चाहत्यांना कार्तिकीने सुखद धक्का दिला आहे. वयाच्या 23 व्या वर्षी तिने आपल्या आयुष्याच्या सेकंड इनिंगला सुरूवात केली आहे...
सारेगमप' या संगीत रिअॅलिटी शो मधून कार्तिकी आपल्या आवाजाच्या जोरावर घराघरात पोहचली. 'घागर घेऊन. घागर घेऊन' या गवळीनेने तर ती तुफान लोकप्रिय झाली. या गाण्याची गायिका म्हणून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. मग तिने मागे वळून पाहिलंच नाही. अनेक कार्यक्रमांमध्ये तिने आपल्या आवाजाची जादू दाखवली.







Comments