लासुर येथे 65%मतदान
- CT INDIA NEWS
- Oct 23, 2019
- 1 min read

वार्ताहार मनीष मुथा लासूर स्टेशन दि. २१-१०-२०१९ रोजी महाराष्ट्र मध्ये निवडणूकिसाठी मतदान झाले आहे. मतदानाची वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत होती सायंकाळी ५ वाजे नंतर मोठ्या प्रमाणात मतदारांची गर्दी वाढल्याने येथील जि. प. प्रशाळा लासूर स्टेशन व सावंगी येथील केंद्रावर ७.४५ पर्यंत मतदारांची रांग लागल्याची दिसून आली. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी शिल्लेगाव पिलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद शौकत आली, उपनिरीक्षक सतीश दिंडे उपनिरीक्षक राम बारहाते, आय आर बी बटालियन चे जवान, तलाठी अमर तोरंबे, पोलीस पाटील विनोद त्रिभुवन, मतदान सहाय्यक प्रशांत दाभाडे, क्षेत्रीय अधिकारी विजय ठाकूर यांनी परीश्रम घेतले लासूर स्टेशन केंद्र अंतर्गत ६५ टक्के मतदान झालेले आहे.
Comments