top of page

लासुर येथे गरजु कुटुंबाना जीवनाशक वस्तु वाटप

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Apr 8, 2020
  • 1 min read

ree

वार्ताहार -मनिष मुथा लासुर स्टेशन- 'निराधार व अपंग 500 गरजूं कुटूंबाना जिवनावश्यक वस्तू वाटप. लासुर स्टेशन : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याने सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे याचा येथील बेघर, गरीब कुटुंब,शेतमजूर यांना फटका बसताना दिसत आहे. लासुर स्टेशन ही मोठी लोकसंख्या असलेली बाजरपेठ असल्याने येथेही मोठया प्रमाणात नागरिक त्रस्त आहेत त्यांना मदत करण्यासाठी येथील कै आंबदासभाऊ व्यवहारे प्रतिष्ठानने सुमारे पाचशे कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्याचा उपक्रम सुरू केला आहे यात गहू,मीठ,तांदूळ,तेल, तूरडाळ, साखर ,चहापत्ति या सोबत आवश्यक भाजीपाला मेथी,वांगी,बटाटे,मिर्ची, कांदा आदी वस्तू पेकेटच्या माध्यमातून घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, या करिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच लासुर स्टेशनचे उपसरपंच गणेश व्यवहारे,शरद पवार राउफ शेख, देविदास म्हस्के, दिनेश व्यवहारे, योगेश व्यवहारे, राहुल पाटेकर, अनिल मोरे, मंगेश गुंजकर,संदीप सोमवते, बाबासाहेब बर्फे, भोला खंडागळे,अतिक कुरेशी हे परिश्रम घेत आहेत.

Comments


bottom of page