लासुर येथे रेल्वे समोर उडी मारून एक जण जखमी
- CT INDIA NEWS

- Nov 7, 2019
- 1 min read
वा

र्ताहर - लासूर स्टेशन, मनीष मुथा – आज सकाळी लासूर स्टेशन येथे रेल्वे दादर जवळ काकीनाडा एक्स्प्रेस ५ वाजून ३९ मिनटाला थांबली, कारण एक माणसाने रेल्वे इंजिन समोर उडी मारली. म्हणून गाडी थांबली असता त्या गाडी खाली तो सदरील माणसाचे १ हात आणि २ पाय गेले. रेल्वेच्या खाली उडी मारलेल्या माणसाला बाहेर काढण्यासाठी लासूर स्टेशन येथील उपसरपंच गणेश व्यवहारे यांचे लहान भाऊ योगेश व्यवहारे यांनी त्याला सदरील माणसाला बाहेर काढले. त्या नंतर लासूर स्टेशन येथील स्टेशन मास्तर कमल श्रीवास्तव यांनी मनीष मुथा यांना फोन केला की गाडी खाली एका माणसाने उडी मारली. त्याच्या नंतर रेल्वे प्रवासी सेना अध्यक्ष संतोष भैय्या सोमाणी हे घटनास्थळी दाखल झाले. आणि संतोष भैय्या सोमाणी यांनी १०८ या नंबरवर फोन करून अम्बुलांस बोलून घेतली आणि रेल्वेखाली जखमी झालेल्या सदरील माणसाला उपचारालासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्ण्यालयात दाखल केले. त्यांच्या सोबत रेल्वे प्रवासी सेना अध्यक्ष संतोष भैय्या सोमाणी हे देखील गेले.







Comments