लासुर स्टॅशन आणि शिल्लेगाव पोलीस ठाणे केले निरजूंतिकर्ण
- CT INDIA NEWS

- May 19, 2020
- 1 min read

वार्ताहार-मनिष मुथा .-- लासुर स्टेशन पोलीस चौकीचे व शिल्लेगाव पोलीस ठाणे निर्जंतुकिकरण लासुर स्टेशन : कोरोनाच्या काळात सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे , येथील शिल्लेगाव पोलीस ठाणेच्या हद्दीत फुलशेवरा येथे रुग्ण आढळल्याने कंटेन्मेंट झोन करण्यात आला असून या काळात मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे . काम करणाऱ्या पोलीस अधिकारी , कर्मचारी , गृहरक्षक दलाचे जवान यांच्या सुरक्षेसाठी येथील शिल्लेगाव पोलीस ठाणे व पोलीस चोकी लासुर स्टेशन निर्जंतुक करावी असा विषय येथील सोशल मीडिया ग्रुप वर आला असता आज संपूर्ण पोलीस ठाणे व चौकी परिसर निर्जंतुक औषधने फवारणी करण्यात आली . या वेळी उपसरपंच गणेश व्यवहारे , शिवसेना शहर प्रमुख नितिन काजूने , अनिल घोडके , गणेश सोमाणी , राजेश चव्हाण , अमोल शिरसाट , लखन गुजर , पवन भंडारी , सतीश गिरुटे , रामेशवर काजूने , विजय पवार , आदेश रण्यवले , भय्या लिगायत , रवी कोठारी यांची उपस्थिती , पोलीस अधिकारी सय्यद शौकत आली यांनी सर्वांचे आभार मानले .







Comments