लासुर स्टेशन पोलीस चौकी येथे दर्पनदिन साजरा करण्यात आला कै.अंबादास व्यवहारे प्रतिष्ठाणतर्फे पत्रकारा
- CT India News
- Jan 7, 2021
- 1 min read
CT INDIA NEWS लासूर स्टेशन प्रतिनिधी मनिष मुथा 6-1-2021
लासुर स्टेशन पोलीस चौकी येथे दर्पनदिन साजरा करण्यात आला कै.अंबादास व्यवहारे प्रतिष्ठाणतर्फे पत्रकाराचा गौरव......
गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथे शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या पोलिस दूरक्षेत्रात व माजी उपसरपंच गणेश व्यवहारे यांच्यावतीने त्यांच्या कै.अंबादास व्यवहारे प्रतिष्ठानच्या कार्यलयात आज राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांचा सत्कार शिल्लेगाव पोलिसांतर्फे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी केला दरम्यान सर्वप्रथम दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक खांडेकर म्हणाले की पत्रकार म्हणजे पोलीस यंत्रणेचा आत्मा आहे त्यामुळे येत्या काळात पोलीस व पत्रकार या दोन्ही यंत्रणांनी एकत्र राहून सामाजिक बंधुता राखणे गरजेचे असल्याचे सांगितले व पोलीस व पत्रकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगितले.त्यानंतर जेष्ठ पत्रकार अशोक जैस्वाल,नेमीचंद कोठारी,लासुर स्टेशन पत्रकार संघाचे अध्यक्ष दैनिक सकाळचे अविनाश संगेकर,गणेश केरे,दैनिक लोकमतचे रामेश्वर श्रीखंडे,दैनिक मराठवाडा साथीचे गुलाब वाघ,दैनिक सामनाचे श्रीराम मढीकर, दैनिक भास्करचे विजय क्षीरसागर,प्रतिविरचे सलीम शहा,मनीष मूथा,दैनिक आत्ताच एक्स्प्रेसचे फिरोज मन्सुरी,आदींनी पुष्पगुच्छ अर्पण केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाब वाघ यांनी केले तर आभार गणेश केरे यांनी मानले तर माजी उपसरपंच यांनी त्यांच्या कार्यलयात पत्रकारांचा गौरव केला यावेळी प्राध्यापक शशिकांत सांगवीकर यांनी पत्रकारांचे आभार मानले.









Comments