top of page

लासुर स्टेशन येथील पोलीस चौकीत प्रशिक्षणार्थी डी.वाय.एस.पी.पूजा गायकवाड यांचा महिला दिनानिम्मित पत्र

  • Writer: CT India News
    CT India News
  • Mar 11, 2021
  • 1 min read

CT INDIA NEWS लासुर स्टेशन प्रतिनिधी. मनिष मुथा



लासुर स्टेशन येथील पोलीस चौकीत प्रशिक्षणार्थी डी.वाय.एस.पी.पूजा गायकवाड यांचा महिला दिनानिम्मित पत्रकार सेवा संघातर्फे सत्कार....


गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील लासुर स्टेशन येथील पोलिस चौकीत आलेल्या प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड यांचा महिला दिनानिम्मित आज पत्रकार सेवा संघाच्या वतीने सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन पत्रकार सेवा संघाचे तालुका सचिव सपना गायकवाड यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.

दरम्यान पूजा गायकवाड यांचा आज प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस होता त्यामुळे दोन्ही प्रसंगाच्या अनुषंगाने त्यांचा सत्कार पत्रकार सेवासंघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने करण्यात आला यावेळी बिट अंमलदार सविता वरपे,पोलीस कॉन्स्टेबल अनिल दाभाडे पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य चे तालुका उपअध्यक्ष गुलाब वाघ, तालुका सचिव सपना गायकवाड, तालुका सरचिटणीस फिरोजभाई मंसुरी,तालुका सदस्य मनीष मूथा आदींसह इतरांची उपस्थिती होती.

Comments


bottom of page