लासुर स्टेशन येथे वाढत्या कोरोनो संसर्गामुळे देवगिरी बँकेकडून आर्षेनिक अलबम गोळ्या वाटप...
- CT INDIA NEWS

- Sep 1, 2020
- 1 min read

प्रतिनिधी- मनिष मुथा लासुर स्टेशन...
*लासुर स्टेशन येथे वाढत्या कोरोनो संसर्गामुळे देवगिरी बँकेकडून आर्षेनिक अलबम गोळ्या वाटप...*
लासुर स्टेशन येथे कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आपल्या सामाजिक सेवेच्या परंपरेला जागत देवगिरी बँकच्या लासूर स्टेशन शाखेच्या वतीने आज लासूर स्टेशन येथे आरशेनिक आल्बम या होमीयोपॅथीक औषधाचे व गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी शाखाधिकारी जगताप साहेब व बँक कर्मचारी यांच्यासह रा.स्व. संघाचे संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्याचे जिल्हा बौद्धिकप्रमुख आप्पासाहेबजी पारदे, गंगापूर तालुका सहकार्यवाह राजेशजी चौहान, भाजपा शहर अध्यक्ष संतोष काळे, प्रितेशसेठ छाजेड यांची उपस्थिती होती.







Comments