लासुर (सावंगी) मध्ये पुन्हा आढळून आले तीन कोरोना पॉझिटिव्ह
- CT INDIA NEWS

- Jul 30, 2020
- 1 min read

वार्ताहार-मनिष मुथा -लासूर स्टेशनला आढळले पुन्हा तीन कोरोनो रुग्ण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचयत असणाऱ्या हसूल सावंगी ग्रुपग्रामपंचायत अर्थात लासुर स्टेशन मधील सावंगी गावामध्ये एक व्यक्ती कोरोनो पॅझिटिव निघाले होते त्यामुळे लासुर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी चौकशी करून त्याच्या संपर्कात 16 लोक आले होते अशी माहिती मिळाली . त्यामुळे सरकारी प्राथमिक केंद्रामार्फत त्या सोळा लोकाचे स्वब घेतले होते . त्या सोळामध्ये दोन पॉझिटिव रुग्ण आढळले . त्यामुळे एकुण तीन कोरोनो पॉझिटिव रुग्ण आढळल्याने लासुर स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ . औटे व त्याचा स्टफ तसेच ग्रामपंचायत लासुर स्टेशनचे ग्रामविकास अधिकारी देविदास ढेपले सर्वश्री . बाजार समितीचे संचालक सुरेश जाधव , दिलीप पवार , अशोक सौदागर , नारायण वाकळे , भिमराव पांडव यांनी भेट देऊन गाव सील केले आहे .







Comments