top of page

. लासुरच्या बाजार समिती संचालकांच्या मुलाची बाजार समिती कामगारांस मारहाण.

  • Writer: CT India News
    CT India News
  • Jul 6, 2021
  • 1 min read

लासूर स्टेशन CT INDIA NEWS प्रतिनिधी. मनीष मुथा 3-7-2021


लासुरच्या बाजार समिती संचालकांच्या मुलाची बाजार समिती कामगारांस मारहाण.


दहा रुपयांच्या प्रवेश फी वरून केली मारहाण....


गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा यार्डात आज दहा रुपयांच्या प्रवेश फी वरून शिल्लेगाव येथील अभिजित शिवाजी नरोडे या रोजंदारीवर कामगार म्हणून काम करणाऱ्या युवकास बाजार समितीच्या संचालक असणाऱ्या महिलेच्या मुलाने कानशिलात लगावल्या.

याबाबतची अधिक माहिती अशी की आज लासुर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा यार्डात लिलाव होता या लिलावात बाजार समितीच्या आवारात कांदा विक्रीसाठी आणला होता यावेळी बाजार समितीच्या एक महिला संचालकांचा कांदा त्यांच्या मुलाने आज दुपारी विक्रीसाठी आणला होता यावेळी दुपारी तीन वाजेच्या सुमारास प्रवेश दारावर जी दहा रुपये प्रवेश फी आकारली जाते त्यामुळे बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर संचालकांच्या मुलाला बाजार समितीच्या रोजंदारी कर्मचारी नरोडे याने प्रवेश फी मागितली असता शाब्दिक चकमक झाली त्यामुळे चिडून संचालकांच्या मुलाने कानशिलात लगावून मारहाण केली त्यामुळे बाजार समितीच्या कांदा यार्डात कर्मचारी वर्गाने काम थांबवले होते त्यावेळी बाजार समिती प्रशासन व इतर संचालक येऊन तोडगा काढण्याचा व प्रकरण दडपण्याचा अयशस्वी प्रयत्न केला मात्र सदर मारहाण झालेला कामगार मुलगा घरी गेल्यानंतर त्याने घडलेला प्रकार शिल्लेगाव येथे घरी गेल्यावर पालकांना सांगितल्यावर भावकितील तरुण व पुरुष मंडळी बाजार समितीच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर बाजार समिती प्रशासनाला मारहाणीचा जाब विचारण्यासाठी संध्याकाळी जमा झाले व बाजार समिती प्रशासनाने सदर संचालकांच्या मुलावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणला मात्र सदर घटनेची माहिती शिल्लेगाव पोलिसांना मिळताच पोलीस तात्काळ या ठिकाणी दाखल झाले व जमाव पांगवला व दोन्ही बाजूकडील जमावाला बाजार समितीच्या एक "बड्या" हस्तीचा फोन आला त्यामुळे हे प्रकरण तात्पुरते निवळले आहे.

.

Comments


bottom of page