लग्नातील अवास्तव खर्च टाळून पोलीस कल्याण निधी साठी 11000 रुपये दिले
- CT INDIA NEWS

- May 26, 2020
- 1 min read

वार्ताहार-मनिष मुथा -लासूर स्टेशन ( गंगापुर)मांजरी, गंगापुर गावातील शेतकऱ्याच्या मुलाने लग्नातील अवास्तव खर्च टाळून औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलिस कल्याण निधीसाठी 11,000 रुपये दिले*
आज दिनांक 24 मे 2020 रविवार रोजी दुपारी मांजरी फाटा येथे शेतकरी कल्याण गटातील शेतकऱ्याची मुलगी ची. सौ. का. कल्याणी गोरखनाथ लांडे माहूली व भेंडाळा येथील चिरंजीव आबासाहेब रामनाथ वाकचौरे यांच्याशी लोकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने विवाह पार पडला. गंगापूर शहरात तसेच औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यामध्ये पोलिसांनी कोरोना या विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांच्या जीविता साठी रस्त्यावर आहोरात्र थांबून जे काम केलेले आहे त्याचं आम्ही काहीतरी देण आहोत अशी जाणीव मनात ठेवून सामाजिक जाणिवेच्या भावनेतून शेतकऱ्यांनी होणारा लग्नातील अवास्तव खर्च टाळून पोलिस कल्याण निधी औरंगाबाद ग्रामीणसाठी 11000/- रुपयांचा चेक नवरदेव नवरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे त्यासाठी डीवायएसपी संदीप गावित साहेब व पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे पोलीस स्टेशन गंगापूर यांच्याकडे आज चेक सुपूर्द करण्यात आला आहे. सर्व स्तरातून नवरी आणि नवरदेव यांचे कौतुक होत आहे तसेच पोलिस विभागाने शेतकरी कुटुंबाचे आभार मानले आहे.







Comments