विक्रमादित्य प्राथमिक शाळा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने कार्यक्रम
- CT INDIA NEWS

- Dec 8, 2019
- 1 min read

वार्ताहार-संभाजी रणवीर (औरंगाबाद)-भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचालित विक्रमादित्य प्राथमिक शाळारामनगर, प्रकाशनगर औरंगाबाद येथीलशाळेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमूख पाहूणे म्हणून डॉ. हेडगेवार रुग्णालयातील जनसंपर्क प्रमूख मा.श्री रोहिदास गांगवे,विक्रमादित्य प्राथमिक शाळेचे कार्यवाह श्री रघुवीर ओक काका ,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गोस्वामी मँडम तसेच पत्रकार संभाजी रणवीर उपस्थित होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी प्रणिता बनसोडे,अक्षदा भालेराव, यश कदम,प्रतिक गायकवाड, प्राची रोडगे, या विद्यार्थ्यांनी भाषण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघर्ष भालेराव या विद्यार्थ्यांने केले. तसेच पाहूण्यांचे आभार मानले.या कार्यक्रमाला सर्व पालक व शिक्षक उपस्थित होते. अशा प्रकारे महापरिनिर्वाण दिन शाळेमध्ये संपन्न झाला.







Comments