*वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार* कारंजा (घा )/प्रतिनिधी :-पियुष रेवतकर. कारंजा (घा ):-तालुक्यातील कन
- CT India News
- Mar 9, 2022
- 1 min read
*वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार*
कारंजा (घा )/प्रतिनिधी :-पियुष रेवतकर.
कारंजा (घा ):-तालुक्यातील कन्नमवार ग्राम येथील युवक आदमखोर वाघाच्या हल्ल्यात ठार .लक्ष्मण हूके वय 33 वर्ष मृत्यू युवक चे नाव असून दररोजप्रमाणे आज सुद्धा आपल्या बकऱ्यानसाठी चारा आणायला गावापासून दूर 500 मीटर वर दूर असलेल्या स्वतःच्या शेतात गेला होता .युवक बकर्यांसाठी चारा घेत असताना आदमखोर वाघाने त्याच्यावर मागून हल्ला केला आणि त्या हल्ल्यात युवकाचे जागीच मृत्य झाला.या अगोदर सुद्धा कन्नमवार ग्राम परिसरात अश्याच प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत .मृत युवकाला 2 मुली ,पत्नी आहे .
Comments