"वाघळी येथे हिवताप प्रतिरोध महिना साजरा" मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एस. जमादार व जिल्हा
- CT India News
- Jun 28, 2021
- 1 min read
"वाघळी येथे हिवताप प्रतिरोध महिना साजरा" मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एस. जमादार व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.अपर्णा पाटील आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे आणि आरोग्य पर्यवेक्षक श्री लुकमान तडवी यांचे मार्गदर्शनाखाली
वाघळी प्रा. आ. केंद्र अंतर्गत हिवताप प्रतिरोग महिना साजरा होत असुन दरवर्षी संपूर्ण जून महिना हिवताप प्रतिरोध महिना साजरा केला जातो त्या अंतर्गत हिवताप प्रतिरोध व इतर आजार जसे डेंग्यू, चिकुनगुणिया , हत्तीरोग, चण्डिपुरा , या आजारा विषयी जनेतेत जनजागृती व्हावी या हेतूने गाव तसेच शहर पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून प्रा. आ. केंद्र वाघळी कार्यक्षेत्रातील वाघळी हिंगोना, मुदखेडा, हातले ,वाघले ह्या उपकेंद्रात कंटेनर सर्वेक्षण करून डासउत्पत्ती स्थान यामध्ये गप्पीमासे सोडणे ताप रुग्णाचे सर्वेक्षण करून रक्तनमुने घेणे सोबत औषधोपचार करणे आशांकरिता कार्यशाळेचे आयोजन आणि जनजागृतीवर हस्तपत्रिकाचे वाटप करण्यात आले तसेच कोरोना सर्व्हेक्षण सोबत अँटीजन टेस्टिंग व आर टी पी सी आर टेस्टिंग कोविड लसीकरण हे कार्यक्रम कार्यक्षेत्रात नियमितपणे सुरू राहतील सदर कार्यक्रम राबविणेकामी प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम केदार डॉ. श्रीमती कोल्हे आ. सहाय्यक श्री. पी. बी. गायकवाड व श्री जे .आर.गायकवाड व प्र.वै.अ. श्री विजय पगारे औषध निर्माण अधिकारी श्री भूषण देवकर आरोग्य सेवक श्री. व्ही. वाय पाटील श्री. एच .एस.कुलकर्णी श्री. डी. व्ही. पवार श्री. विजय दाभाडे श्री.प्रसाद वारूळे व सर्व उपकेंद्रातील समुदाय आरोग्यअधिकारी व आरोग्यसेविका आशा कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.











Comments