वंचित बहुजन आघाडी भ्रष्टाचार प्रकरणी सागरेश्वर अभरण्यासमोर आमरण उपोषण चालू
- CT INDIA NEWS

- Sep 19, 2020
- 1 min read

दि.१८/०९/२०२०
रिपोर्टर- सुधीर शिवाजी थोरात
*वंचित बहुजन आघाडीचे भ्रष्टाचार प्रकरणी सागरेश्वर अभयारण्यासमोर आमरण उपोषण चालू*
यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यातील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाईच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी व ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण सुरु केले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले कि माहिती अधिकाराच्या माध्यमातून प्राप्त माहितीनुसार 2015 ते 2018 या तीन वर्षांतील काही शासकीय कागदपत्रे गहाळ आहेत तसेच बोगस मजुरांची नोंद करत आर्थिक घोटाळा केला आहे, समितीच्या माध्यमातून बाजारभावापेक्षा चौपट दराने वस्तू खरेदी झाली आहे.
त्याचप्रमाणे अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली असून निकृष्ट कंपाउंड मुळे मोकाट कुत्र्यांचा वावर होऊन हल्ल्यांत हरिणांचे मृत्यू होत आहेत.
सदरील बाबी गेल्या वर्षी निदर्शनास आणून देऊन व कारवाईसाठी वारंवार पाठपुरावा व आंदोलन करून देखील अद्याप कोणतीही कारवाई झाली नसलेने सदर प्रकरणी दोषींवर व वर्षभरापासून दोषींना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालेशिवाय कोणत्याही परिस्थितीत हे आंदोलन स्थगित करणार नाही
सदर आंदोलनात वंचितचे युवक जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे, संघटक अमोल गायगवाळे, महासचिव विनीत कांबळे व ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद मिसाळ हे आंदोलकर्ते उपोषण करत आहेत.
वंचित बहुजन आघाडीच्या या आंदोलनास रिपाई आठवले गटाचे नेते महादेव होवाळ, विशाल तिरमारे, विजय गवाळे तसेच भिम आर्मी, SBC संघर्ष समिती व जनता क्रांती दलाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला तसेच ग्रामस्थांच्या वतीने डॉ.प्रमोद गावडे, बी.टी.(दादा)महिंद, आनंदराव मोरे,जयकर पवार,भरत साळुंखे,कय्युम मुल्ला,आकाश मायणे,श्रीदास होणमाने,मनसे अध्यक्ष तुकाराम भोसले,विजय गवाळे, विकास चव्हाण यासह भागातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.







Comments