वैजापूर लासुरगाव येथील देवी दाक्षायणी मातेचा नवरात्री निमित्त घटस्थापना उत्सव साधारण पणे.
- CT India News
- Oct 18, 2020
- 1 min read
वैजापूर लासुरगाव येथील देवी दाक्षायणी मातेचा नवरात्री निमित्त घटस्थापना उत्सव साधारण पणे.
लासुर स्टेशन CT INDIA NEWS प्रतिनिधी मनिष मुथा लासुरगाव ता.वैजापूर येथील शिवना नदी तीरावर वसलेली कुलस्वामिनी श्री देवी दाक्षायणी मातेच्या नवरात्र उत्सव निमित्त घटस्थापना होऊन महाआरतीने साध्या पध्दतीने नवरात्र उत्सवास सुरवात झाली.मातेचा नवरात्र उत्सव अनेक वर्षांपासून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो परंतु यंदा कोरोना चा प्रदुभाव वाढवू नये म्हणून कोरोना चे नियम पाळुण साध्या पध्दतीने धार्मिक कार्यक्रम ब्राहमवृदांनाच्या उपस्थितीत साजरे करण्यात आला. नवरात्र उत्सव दि. 17 आॕक्टोंबर ते दि.25 आक्टोंबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे घटस्थापना, होमहवन, महाभिषेक, विजयादशमी आदी धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत.मात्र अनेक वर्षाची नवरात्र उत्सवाची परंपरा यंदा भाविकांना दर्शना विना नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे यंदा श्री देवी दाक्षायणी मातेच्या नवरात्र उत्सव भाविकांनी घरचे घरीच मातेचे दर्शन घेऊन साजरा करून कृपाशिर्वाद घ्यावा.लासूरगाव नगरीत गर्दी करू नये असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतिने करण्यात आलेआहे









Comments