विठ्ठलवाडी येथिल नागरिकांसाठी भुयारी मार्ग करण्याची मागणी
- CT INDIA NEWS

- Dec 12, 2019
- 1 min read

वार्ताहार-शिवाजी सुतार कवठेमहांकाळ-तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली येथील रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील नागरिकांसाठी भुयारी मार्ग करण्याची मागणी होत आहे ग्रामस्थांच्या वतीने विठ्ठलवाडी येथ रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे मार्गा नंबर 166 चे काम चालू आहे सुमारे 15 ते 20 फुट ऐवठ्या मोठ्या प्रमाणावर सदर रस्त्याची उंची वाढली आहे अगोदरच विठ्ठलवाडी हे गाव उतारावरती बसलेले आहे आणि आता तर आणखी उंची वाढली आहे त्यामुळे या गावांसाठी रस्ता शिल्लक राहिला नाही येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता नाही शिवाय चारचाकी बैलगाडी मोटरसायकल सायकल साठी रस्ता राहीला नाही महामार्गावर वहाने उभीं करून गावांमध्ये चालत जावे लागते वृध्द महिला शेतकरी विद्यार्थी आजारी पेशंट यांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो या मुळे ग्रामस्था मध्ये तिव्र नाराजी पसरली आहे स्थानीक कार्यालयाकडून विठ्ठलवाडी गावाकडे दुर्लक्ष होत आहे आत्ता राष्ट्रीय महामार्गाने दुसरा अन्याय केला आहे रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक या मागणी कडे जाणीव पुरवक दुर्लक्ष करत आहे विठ्ठलवाडी येथील भुयारी मार्ग झाला नाहीतर येत्या दहा ते बारा दिवसांत राष्ट्रीय महामार्गावर सर्व ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर भुयारी मार्गाचे काम चालू करण्यात यावी ही मागणी पूर्ण करण्यात यावी







Comments