विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील नामांतर शाहिद स्तंभाची दुर्दशा
- CT INDIA NEWS

- Sep 24, 2019
- 1 min read

औरंगाबाद:-प्रतिनिधी - अमरदिप हिवराळे येथील विद्यार्थी नेते प्रा.शिलवंत गोपनारायण यांनी असे सांगितले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या लढ्यात शाहिद झालेल्याची आठवण म्हणून आणि त्यांना आदरांजली म्हणून शहीद स्तंभाची आज दुरावस्था झाल्याचे दिसते तिथे गवत आणि झाडे आल्यामुळे ते कधीही खचून पडू शकते. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळावे म्हणून एक नाही दोन नाही तर अवघी १७ वर्ष संघर्ष करावा लागला फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी दलित बांधवांनी अनेक अन्याय - अत्याचार, जुलूम सहन केले. गावोगावी, शहरात आणि खेड्यापाड्यापर्यंत नामांतराच्या आंदोलनाची ठिणगी पडलेली होती. जिकडे-तिकडे एकाच नारा गुंजत होता “नामांतर झालेच पाहिज”. नांदेडमध्ये दलित पँथरच्या गौतम वाघमारे या कार्यकर्त्याने सरकार नामांतर करत नाही म्हणून स्व:ताला भरचौकात जाळून घेतले. अखेरच्या श्वासापर्यंत एकाच नारा होता, "नामांतर झालेच पाहिजे" बाबासाहेबांच्या नावासाठी त्याने आपल्या प्राणाचे बलिदान केले . परभणी जिल्हातही पोचिराम कांबळे यांचे हात-पाय तोडण्यात आले. त्यांनाही जातीयवादी सैतानांनी जर्जर करून ठार मारले. जनार्धन मवाडे, सुहासिनी बनसोडे, प्रतिभा तायडे, चंदन कांबळे असे कितीतरी दलित क्रांतिवीर नामांतराच्या लढ्यात शहीद झाले. अनेकांना तुरुंगात जावे लागले , लाठ्या खाव्या लागल्या , अनेकांना आपल्या घरावर तुळशीपत्रे ठेऊन नामांतराच्या लढ्यात उतरावे लागले १७ वर्षाच्या कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली व १४ जानेवारी इ.स. १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद’ असा नामविस्तार करण्यात आला. ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली, मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावे हि सर्वप्रथम कल्पना मांडली त्या महापुरुषाचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी १७ वर्ष संघर्ष करावा लागला. अन याच शहिद स्तंभाची आज गवत आणि झाडांमुळे दुरवस्था झाली आहे तरी संबंधित अधिकारी, विद्यापीठ प्रशासन तसेच मनपा बांधकाम विभाग यापैकी जे जबाबदार असतील त्यांनी योग्य ती व्यवस्था करून योग्य ती पाऊले उचलावीत जेणे करून नामांतराच्या लढ्यातील शाहीदांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली असे होईल.







Comments