विद्यापीठ प्रशासनाची पळवाट डबल पीजी असणाऱ्यांना वस्तीग्रह सोडण्याची सक्त
- CT INDIA NEWS

- Sep 6, 2019
- 1 min read

औरंगाबाद :- आकाश हिरवाळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काल दुसऱ्यांदा पदव्युत्तर शिक्षणास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना वस्तीगृहात प्रवेश नाकारण्यात आला व त्वरित खोल्या खाली करण्यासाठी फर्मान काढण्यात आले. दुसऱ्यांदा प्रवेश घेण्याच्या निकषावर वस्तीगृह नाकारत असेल तर विद्यापीठाने दुसर्यांदा प्रवेश दिलाच कशाला? असा प्रश्न विचारला असता तुम्ही प्रवेश रद्द करा असे कुलगुरू बोलले.एकीकडे विभागाला विद्यार्थी भेटत नाही म्हणून प्रवेश करून घ्यायचे व दुसरीकडे वस्तीगृह नाकारायचे ही प्रशासनाची दुटप्पी भूमिका आहे असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या समस्येच्या निवारणासाठी नवीन वस्तीगृह उभारण्याची उपाययोजना करण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात आहे. अनेक वर्षांपासून नवीन वसतिगृहाची मागणी असूनही प्रशासन याबाबत संवेदनशील नाही. म्हणून तूर्तास तरी म्हणजेच नवीन वस्तीगृहाच्या निर्मितीपर्यंत आपण हा निर्णय रद्दबातल करावा अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंना दिले. याप्रसंगी कुलगुरूंची बैठक चालू असल्यामुळे विद्यार्थिनींनी कुलगुरूंच्या दालनाबाहेरच ठिय्या मांडला. तद्नंतर कुलगुरूंनी विद्यार्थिनीची भेट घेतली,येथे शिक्षण घेणाऱ्या बहुतांशी मुली या ग्रामीण भागातील असून बाहेर खोली करून राहण्यासाठीचा खर्च त्यांना न झेपावणार आहे. तसेच बाहेर मुलींच्या सुरक्षिततेचा ही प्रश्न भेडसावतो. त्यामुळे वस्तीगृहातच राहण्याची सोय करावी अशी विनंती शिष्टमंडळाने कुल
गुरू येवले सराना केली परंतु आत्ताच याबाबत कुठलेही आश्वासन देता येणार नाही अशी भूमिका कुलगुरूंनी घेतली,असे निर्णय घेण्याऐवजी लवकरात लवकर नवीन वसतिगृहांची उभारणी करण्यात यावी यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती शिष्टमंडळाने कुलगुरूंना केली. या वेळी विद्यापीठ अध्यक्ष दीपक बहिर,दिक्षा पवार,अजय पवार,आहेर पूनम,वंदना साळवे,ढगे सिंधु,अश्विनी कुलकर्णी प्रमेश्वर कास्टे,सुनील कल्याणकर व इतर अनेक विद्यार्थी उपस्तित होते







Comments