विना रेशनकार्ड धारकांना प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ मिळणार
- CT INDIA NEWS

- May 29, 2020
- 1 min read

विना रेशनकार्डधारकांना प्रतिव्यक्ती मोफत पाच किलो तांदूळ मिळणार…
आधारकार्ड द्यावे लागणार
औरंगाबाद, 26 मे (वार्ताहार-विक्रम वानखेडे ) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य योजनेअंतर्गत कोणत्याही केंद्र व राज्य योजनेत समाविष्ट नसलेल्या विना शिधापत्रिका धारकांना माहे मे 2020, जून 2020 या दोन महीन्याचे प्रती व्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ रास्त भाव दुकानातून वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती डि-24 न्यूजला जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव किरवले यांनी दिली आहे. धान्याचे वितरण लाभार्थ्यांना ऑफलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांकडून त्यांचे आधार कार्ड किंवा कोणतेही शासकीय ओळखपत्र सादर करने आवश्यक आहे. दोन्ही महीन्याचे धान्याचे वितरण माहे जूनमध्ये करण्यात येईल. औरंगाबाद शहरातील 115 वार्डात 52160 लाभार्थ्यांना मोफत तांदूळ वितरित करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी, वार्ड अधिकारी कार्यालय व अन्नधान्य वितरण केंद्र यांचे मार्फत विनाशिधापत्रिका धारकांना अर्ज वाटप केले जाणार आहे. अर्ज 31/5/2020 पर्यंत भरुन द्यावे लागेल. असे अन्नधान्य वितरण अधिकारी, औरंगाबाद, आर.के.मेंडके यांनी कळवले आहे.







Comments