विभागाने पकडले विना परवाना सागवान
- CT India News
- Mar 24, 2022
- 1 min read
_चाळीसगाव ता. प्रतिनिधी : पत्रकार विकी पानकर मो. 8605074861_
*वन विभागाने पकडले विना परवाना सागवान वाहतुक करणारे वाहन*
चाळीसगाव सागवान मालाची वाहतुक करणारे वाहन चाळीसगाव वनविभागाने पकडले आहे . या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे पकडलेले सागवान किती किंमतीचे आहे हे समजून आले नाही . विना पास बिना पास वाहतुक करीत आहे . या बातमीनुसार आडगाव गावाजवळ सापळा रचून वन विभागाने एमएच . ३१ एपी . ७१ ९ ५ हे वाहन सागवानसह ताब्यात घेतले . ही कारवाई उपवनसंरक्षक होशींग सहाय्यक वनसंरक्षक शिसव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे , वनपाल जी एस पिंजारी , वनपाल आर व्ही चौरे , वनरक्षक एस बी चव्हाण वनरक्षक आर आर पाटील , बनमजूर बाळू शितोळे , वाहनचालक राहूल मांडोळे यांनी केली . आज दुपारी ही कारवाई करण्यात आली याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती हे जप्त सागवान कुठून कुठे जात होते हे समजून आले नाही . या घटनेची माहिती अशी की , गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव मालेगाव रस्त्यावर एक वाहन दरम्यान तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदा वृक्षतोड सुरू असल्याची ओरड आहे .
Comentarios