व्यापारी शेतकऱ्यांचा कांदा 50 ते 100 रुपये प्रतिकुंटक घेत असल्याचा आरोप
- CT INDIA NEWS

- Aug 5, 2020
- 1 min read

वार्ताहार-मनिष मुथा -लासुर स्टेशन
लासुरच्या कांदा मार्केटला शेतकऱ्याचा राडा....
व्यापारी शेतकऱयांचा कांदा 50 रुपये ते 100 रुपये प्रतिक्विंटल भावात घेत असल्याचा आरोप.....
लासुर स्टेशन येथील बाजार समितीच्या अखत्यारीत असलेल्या कांदा मार्केट मध्ये लिलाव चालू असताना कांद्याचा लिलाव फक्त पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रति कुंटल घेत असल्याने शेतकर्याणी व्यापाऱयांविरुद्ध एल्गार पुकारत कांदा फेकला व घोषणा देत व्यापाऱयांचा निषेध केला तसेच कांद्याचा लिलाव बंद पाडला.
याबाबत बोलताना शेतकर्याणी सांगितले की शेतकर्याना कांदा मार्केट पर्यंत आणेपर्यंत प्रतिक्विंटल दीडशे रुपये खर्च येतो त्यात गोणी,गाडीभाडे,भराई, तोलाई,हमाली यांचा समावेश असुन आज मात्र व्यापाऱ्यानी लिलावादरम्यान कांद्याचा भाव अत्यल्प म्हणजे 50 ते 100 रुपये दरम्यान कांद्याचा लिलाव प्रतिक्विंटल भाव पुकारला त्यामुळेच आम्ही व्यापाऱयांचा निषेध करत असल्याचा आरोप शेतकरी बांधवांनी केला असून यापूढे जर असाच लिलाव लासुर स्टेशन बाजार समितीच्या कांदा मार्केट मध्ये झाला तर आम्ही येथे कांदा विक्रीसाठी का आणावा असा प्रतिसवाल शेतकर्याणी केला आहे.
दरम्यान या प्रकरणाची माहिती बाजार समिती प्रशासनाला मिळाल्यावर सचिव कचरू रणयेवले यांनी कांदा मार्केट मध्ये धाव घेतली व त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की काही कांदा खराब असल्याने व्यापारी भाव कमी देत आहे व चांगल्या प्रतीच्या कांद्याला 500 रुपयांच्या पुढे भाव दिला आहे मात्र शेतकऱयांचे समाधान न झाल्याने शेतकर्याणी सांगितले की व्यापाऱयांची भावाचे रजिस्टर तपासा त्यात कांदा कुठेही 500 रुपयाने व्यापार्यानी खरेदी केले असल्याचे दिसणार नाही त्यामुळेच आम्हिच लिलाव बंद पाडले असल्याचे शेतकऱ्यानी सांगितले.







Comments