वार्ड क्रमांक-52 -नारळीबाग मध्ये हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न
- CT INDIA NEWS

- Feb 2, 2020
- 1 min read

वार्ताहार-संभाजी रणवीर -संभाजी नगर-वॉर्ड क्र. ५२ नारळीबाग येथे हळदी-कुंकूचे कार्यक्रम संपन्न संभाजीनगर (२९) : प्राजक्ता विश्वनाथ राजपूत यांच्या तर्फे (ता. २९) श्री पावन गणेश मंदिर नारालीबाग खड़केश्वर या ठिकाणी तीळ-गुळ व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण, स्वसंरक्षण यावर जनजागृती करावी असे प्रतिपादन अनुराधा दानवे यांनी केले या कार्यक्रमात वॉर्ड क्र ५२ येथील महिलांनी सहभाग घेतला आणि कु. रिद्धि आणि कु.सिद्धी हत्तेकर या जुळया बहिणी ने जिमन्यास्टिक स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्या बद्दल त्यांचा नागरिक सत्कार सौ.अनुराधा अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आला. मकरसंक्रांतीनिमित्त श्री पावन गणेश मंदिर नारालीबाग खड़केश्वर या ठिकाणी प्राजक्ता विश्वनाथ राजपूत यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांची ओटी भरून त्यांना वाण देण्यात आले. यावेळी नगरसेविका सुनीता आऊलवार, बकीला राजपूत, शारदा राहुत, प्रतिभा राजपुत, मीरा पूछे, सुनीता उचाडे, खड़केश्वर नाराळीबाग येथील महिलांची उपस्थिती होती.







Comments