top of page

वाळूची अवैध वाहतुक चाळीसगावला कारवाई चाळीसग

  • Writer: CT India News
    CT India News
  • Mar 9, 2022
  • 1 min read

*चाळीसगाव ता. प्रतिनिधी : विकी पानकर मो. 8605074861*


वाळूची अवैध वाहतुक चाळीसगावला कारवाई


चाळीसगाव : वाळूची अवैध वाहतुक करणा-या दोघांवर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली असून दोघांना अटक करण्यत आली आहे. महादू भिकन सोनवणे (22) चालक व एकनाथ शंकर राठोड (53) ट्रॅक्टर मालक दोघे रा. सांगवी ता. चाळीसगाव अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर, ट्रॉली व एक ब्रास वाळू असा एकुण 3 लाख 5 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

महसुल विभागाच्या वतीने तलाठी भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गु.र.न.111/22 भा.द.वि. 379,109 सह महाराष्ट्र जमीन महसुल संहिता कलम 189 नुसार मध्यरात्री 1.45 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसुल पथकातील विलास शेळके, तलाठी भामरे, निलेश अहिरे, गणेश गढरी तसेच चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पो.नि. संजय ठेंगे यांच्यासह सहायक फौजदार राजेंद्र साळुंखे, हे. कॉ. नितीन सोनवणे, पोलिस नाईक शंकर जंजाळे, संदीप माने, मनोज पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पो.नि.संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस नाईक मनोज पाटील करत आहेत.Q

Comments


bottom of page