विश्वकर्मा वंशीय समाज तर्फे आणि उपाध्यक्ष श्री मुरलीधर कऊटकर यांनी वाटले सॅनिटायझर
- CT INDIA NEWS

- May 2, 2020
- 1 min read

वार्ताहार-नारायण पांचाळ_नांदेड-*आज १ मे महाराष्ट्र दिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाचे औचित्य साधून महाराणा प्रताप चौक येथे नांदेड उत्तर शहर भागाचे आमदार श्री बालाजीराव कल्याणकर साहेब यांनी नांदेड म.न.पा.प्रभाग 3,4 व 10 चे स्वच्छता कामगार यांना साखरेचे वाटप करुन तोंड गोड केले .*_ _*विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष श्री मुरलीधर कऊटकर यांनी या कोरोणा कोविड 19 च्या काळात जिवाची पर्वा न करता स्वच्छता कामगार काम करित आहेत त्यांना आमदार श्री बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या उपस्थितीत हॅण्ड सॅनेटायझरचे वाटप करून स्वच्छता कामगारांना याचे महत्त्व समजावून सांगितले व तोंडाला मास्क नियमितपणे वापरावे, सॅनेटायझर कसे वापरावे व हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवून काळजी कशी घ्यावी याबाबत कल्याणकर साहेबांनी मार्गदर्शन केले आहे. या प्रसंगी श्री रतन रोडे ,श्री विजय वाघमारे स्वच्छता निरीक्षक हे उपस्थित होते*_







Comments