top of page

*वडूजमध्ये विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई*

  • Writer: CT India News
    CT India News
  • Mar 25, 2021
  • 1 min read

*वडूजमध्ये विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई*


तडवळे प्रतिनिधी /

श्री जे.के.काळे

कोरोनाचा वाढता धोका व वाढता संसर्ग रोखण्यासाठी विना मास्क बेजबाबदारपणे फिरणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाच्या वतीने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. कोरोना धोका संपला अशा अविर्भावात बेफिकीरपणे फिरणाऱ्या लोकांना तोंडावर मास्क बाधणे नको वाटू लागले आहे. परंतु कोरोनाचा धोका अजूनही टळला नाही. प्रशासनाच्या वतीने सुचना देवूनही नागरिकांचा बेफिकीरपणा वाढतच असल्यामुळे पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे.

वडूज पोलिस ठाण्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.निलेश देशमुख यांच्या वतीने वडूज शहरासह वडूज परिसरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकावर अचानक २०० रूपये चा दंड आकारण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामुळे विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांचा भंबेरी उडाली होती.

नागरिकांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे अशा सुचना प्रशासनाकडून वारंवार केल्या जात आहेत. परंतु याला केराची टोपली दाखवून नागरिक बेफिकीरपणे वडूज शहर व परिसर रस्त्यावर दिसून येत आहेत. वडूजमध्ये अशा बेजबाबदार नागरिकांविरूध्द २०० रूपये आकारून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर वडूज पोलिस ठाण्याच्या वतीने नजर ठेवण्यात येत आहे. यामुळे पोलिस ठाण्यातर्फे होत असलेल्या कारवाईमुळे आता कधीही आपल्याला नियम मोडल्यास कारवाई होऊ शकते हे नागरिकांच्या लक्षात आले आहे.

Comments


bottom of page