वडगाव तालुका माण येथे शिक्षणाधिकारी यांची भेट.
- CT India News
- Mar 22, 2021
- 1 min read
वडगाव तालुका माण येथे शिक्षणाधिकारी यांची भेट.
तडवळे -जे. के.काळे.प्रतिनिधी- दहिवडी ता. माण येथून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती प्रभावती कोळेकर यांनी इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांसाठी कोरोना कालावधीत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी अनेक प्रकारे प्रश्न विचारून तर संवादाद्वारे त्याचप्रमाणे विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांची प्रगती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद, शिक्षण सुरू असताना उपशिक्षक संजय खरात यांनी वाड्या-वस्त्या वर जाऊन विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती थांबू नये तसेच कोरोना सारखा आजारात त्यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन घरामध्येच त्यांच्या शाळा निर्माण केली बहुदा हा राज्यातील पहिलाच शिक्षक असावा ज्याने विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून कोरोना सारख्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये अध्ययन क्षमता विकसित करण्यासाठी एक प्रकारची अग्निदिव्य केले आहे खरोखरच संजय खरात यांचे कार्य कौतुकास्पद असल्याची भावना जिल्हा परिषद सातारा येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी आपली भावना व्यक्त केली तीन हजाराहून अधिक गृहभेटी देऊन हा उपक्रम जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील सर्व शिक्षकांना प्रेरणादायी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले विद्यार्थ्यांना घर आणि शाळा एकच वाटत असल्याने विद्यार्थी हा शाळेविषयी प्रेम तसेच शिक्षणाविषयी आपुलकी गोडवा निर्माण झाल्याची माहिती त्यांनी दिली शिक्षकांनी दिलेल्या विविध साहित्यामुळे मुलांना हसत खेळत शिक्षण मिळाल्याची भावना येथील पालकांनी व्यक्त केली घरात निर्माण झालेली शाळा आम्हाला आवडते त्याचप्रमाणे सरांनी पुरवलेले साहित्य वापरून तर कधी वडिलांच्या मदतीने तर कधी विद्यार्थी स्वतः अभ्यास करत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनुसया गोरे यांनी शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांचे स्वागत केले यावेळी दहीवडी केंद्राचे केंद्रप्रमुख सदर उपक्रमाविषयी माहिती देऊन आभार मानले









Comments