वन्यजीव अधिनियम कायद्याचे केले उल्लंघन , भय न बाळगणाऱ्या वनपाल , वनरक्षक , वनमजूर यांचे निलंबन .
- CT India News
- Feb 10, 2021
- 3 min read
विभागीय वनधिकारी औरंगाबाद मा.श्री.विजय सातपुते यांची धडक कारवाई,क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनच्या तक्रारीची वरिष्ठ स्तरावरून दखल
क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार वनपरिक्षेत्र अधिकारी (पाटणा ) श्री.एम.डी.चव्हाण तसेच त्यांचे सहकारी वनमजुर जगन मोरकर व वनमजुर रामचंद्र पाटील यांनी संगन मताने , दिनांक २६/१२/२०२० रोजी पाटणादेवी अभयारण्य (संरक्षित क्षेत्र) येथे दिवसा ढवळ्या पथीकाश्रम येथील जुन्या नर्सरीतील काही जिवंत झाडांची इलेक्ट्रिक कटर च्या सहाय्याने कत्तल केली व दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साहाय्याने पिंपरखेड येथील एका लाकूड व्यापारास रुपये तीस हजाराला(30000) विकली. ही अतिशय गंभीर बाब समजताच क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनच्या जिल्ह्या अधिकाऱ्यांनी क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनच्या राष्ट्रीय मुख्य तपास अधिकाऱ्यांना सदर तक्रार पाठवली तक्राची गंभीरता लक्षात घेऊन त्वरित राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधान मुख्य वन संरक्षक ( वन्यजीव) नागपूर तसेच अपर प्रधान मुख्य संरक्षक पश्चिम विभाग मुंबई , विभागीय वन अधिकारी औरंगाबाद तसेच श्री राजेश ठोंबरे मानद वन्यजीव रक्षक जळगाव यांना सदर तक्रार दिनांक ०२/०१/२०२१ रोजी पुराव्यानिशी सादर केली होती. यात वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 यातील विविध कलमां नुसार संरक्षित अभयारण्य क्षेत्रात असे कृत्य करणे हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे .
या तक्रारची गंभीर दखल घेत प्रधान मुख्य वन संरक्षक ( वन्यजीव) नागपूर मा. श्री.नितीन काकोडकर आणि
अपर प्रधान मुख्य संरक्षक पश्चिम विभाग मुंबई मा.श्री.सुनील लिमये यांनी विभागीय वन अधिकारी औरंगाबाद मा.श्री. विजय सातपुते यांना सदर गंभीर तक्रारी बाबत तातडीने कारवाईचे आदेश दिले.विभागीय वन अधिकारी औरंगाबाद यांनी दोन सहाय्यक उपवनसंरक्षक आणि तीन वनपरिक्षेत्र अधिकारी यांची चौकशी समिती गठीत करून सदर गुन्ह्याबाबत सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.या चौकशी समितीने अहवाल विभागीय वन अधिकारी औरंगाबाद यांना सादर केला त्या नुसार मा. श्री. विजय सातपुते यांनी साहाय्यक उप वनसंरक्षक श्री एस. पी.काळे याना आदेश पारित करून वनपाल पाटणा / वनरक्षक पाटणा श्री. प्रवीण गवारे, तसेच वनमजुर श्री.जगन मोरकर व वनमजुर रामचंद्र पाटील यांना निलंबित केले. तसेच या गुन्ह्या मध्ये वापरलेले ट्रॅक्टर ट्रॉली सह इलेक्ट्रॉनिक कटर मशीन , करवत ,कुऱ्हाड जप्त करून सदर साहित्य सरकार जमा करण्याची कार्यवाही सुरू केली.मा.अपर प्रधान मुख्य वन संरक्षक श्री लिमये या केस संदर्भात काय कारवाई केली असे भ्रमणध्वनी वर विचारले आसता.वन परिक्षेत्र अधिकारी श्री. एम.डी. चव्हाण यांच्यावर या गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने दोषारोप निश्चित केल्याचे सांगितले.
तक्रार दाखल दिनांक 02/01/2021 पासून ही कारवाई होई पर्यंत मध्ये मोठा कालावधी वाया घालवला. आमच्या तक्रारीत नमूद ह्या गुह्यतील प्रथम व्यक्ती वनपरिक्षेत्र अधिकारी पाटणा श्री. एम.डी. चव्हाण याना देखील तातडीने निलंबित करणे आवश्यक असतांना कारवाई मात्र वनपाल,वनरक्षक,वनमजुर यांच्या वरच झालेली दिसत आहे.या प्रकरणाची चौकशी केली असतांना आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार सदर गुन्ह्यात सहभागी असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. एम.डी. चव्हाण हे चौकशी अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करीत असल्याचे खात्री लायक समजले आहे .मा.वनमंत्री श्री.संजय राठोड हे माझ्या नात्यातील असल्याने मला या प्रकरणातून सही सलामत बाहेर काढले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांची मागील प्रकरणे उकरून काडून चौकशी लावतो असे संबंधित अधिकाऱ्यांना धमकावले जात आहे.त्याच बरोबर मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देखील संबंधित अधिकाऱ्यांना याच स्वरूपाचे फोन केले जात आहे.तसेच स्वतःच्या ताब्यातील शासकीय दप्तरात मागील तारखांचे फेर फार करून या गुन्ह्याच्या अनुषंगाने मागील तारखांचे POR देखील सोडल्याचे समजले आहे. विभागीय वन अधिकारी औरंगाबाद श्री.विजय सातपुते,वन संरक्षक श्री. डी. डब्ल्यू. पगार धुळे,अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक मुंबई श्री सुनील लिमये आणि प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर श्री.नितीन काकोडकर या गंभीर गुन्ह्यातील सहभागी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री एम.डी.चव्हाण यांना मा. मंत्री महोदय आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या दबावामुळे यांच्यावर कादेशीर कारवाई करण्यास धजावत नसतील तरी आम्ही मात्र संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या 55C नोटीसीच्या कालमर्यादेनंतर कोर्टात ही केस दाखल करणार आहोत.त्याच बरोबर केंद्रीय सतर्कता आयोग दिल्ली (CVC) यांचे कडे देखील ही केस पाठवीत आहोत.









Comments