वरणगाव येथील सेंट्रल बँकेत बंदुकीतून चुकून उडाले बार
- CT INDIA NEWS

- Aug 23, 2019
- 1 min read

जळगाव: (वृत्तसंस्था) बँकेच्या सुरक्षा रक्षकाच्या हातातील बंदूकीमधुन अचानक गोळी सुटली असता चार जण जखमी झाले. ही घटना काल दुपारी २.३० वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यामधील वरणगाव येथे सेंट्रल बँकेच्या शाखेत घडली. बंदुकीचा लॉक काढत असताना चुकीने ही घटना घडली. बँकेत कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक लालचंद्र चौधरी यांच्या हातून ही घटना घडली. नेहमी प्रमाणेच बँकेत व्यवहार सुरू होते. अनेक ग्राहक हे आर्थिक व्यवहारासाठी आले असता दुपारी २.३० च्या सुमारास लालचंद्र चौधरी यांच्याकडे असलेली बंदूक अचानक पणे लॉक झाली. तिचा लॉक काढत असताना गोळ्या फायर झाल्या.यामध्ये दुर्घटनेत प्रमिला वसंत लोहार (रा. तळवेल ता. भुसावळ), शोभा प्रकाश माळी आणि कलाबाई चौधरी तसेच राधेश्याम छबिलदास जैस्वाल (रा. वरणगाव) जखमी झाले असून अचानक झालेल्या या प्रकारामुळे बँकेत खळबळ उडाली.या ठिकाणी जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि हा प्रकार समजता त्वरित वरणगाव पोलिसांनी धाव घटनास्थळी घेतली.पोलिसांनी लालचंद्र चौधरी यांना ताब्यात घेतले असून बँकेचे आर्थिक व्यवहार स्थगित करण्यात आले आहेत.







Comments