वसुसायगावच्या सरपंचाची अज्ञात कारणाने फाशी घेऊन आत्महत्या .
- CT India News
- Apr 3, 2021
- 1 min read
CT INDIA NEWS लासुर स्टेशन प्रतिनिधी मनिष मुथा। वसुसायगावच्या सरपंचाची अज्ञात कारणाने फाशी घेऊन आत्महत्या .
वसुसायगावच्या सरपंचाची अज्ञात कारणाने फाशी घेऊन आत्महत्या .... गंगापुर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील वसूसायगाव येथील सरपंच विठ्ठल तुकाराम शेजवळ ( वय वर्ष 60 ) यांनी रात्री दोन वाजेच्या सुमारास गावात घरासमोरील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येचे कारण कळले नसून अज्ञात कारणातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे समजते . दरम्यान लासुर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले व डॉ . जितेंद्र मंडावरे यांनी उत्तरीय तपासणी केली असून शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश दिंडे करत आहे









Comments