शेंदूरणी भारतीय जनता पार्टी च्या वतीने राज्यव्यापी घंटानाद- दार उघड उद्धवा मंदिराचे दार
- CT INDIA NEWS

- Sep 1, 2020
- 1 min read

भारतीय जनता पार्टी तर्फे
राज्यव्यापी घंटानाद आंदोलन दार उघड उद्धवा दार उघड मंदिराचे दार उघड.
शेंदूर्णी:-संतोष महाले - शेंदूरणी - राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारने जागतिक कोरोना संकट काळात दारूची दुकाने उघडी केलीत,बाजारपेठा उघड्या केल्यात, बाजारात प्रचंड गर्दी,मात्र भक्तांच्या भावना जाणीवपूर्वक लक्षात घेत नाहीत.
केंद्र सरकारने दि.४जून २०२०रोजी नियमावलीसह परिपत्रकही जारी केले तरी अजून राज्यातील देवस्थाने बंदच ठेवली आहेत.
मंदिरे सुरू करा या मागणी करीता महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संघटना , धर्मचार्य आणि प्रमुख देवस्थाने एकत्र येऊन कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या ठाकरे सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
आज दि. २९ ऑगस्ट २०२० रोजी स. ११.३० वाजता श्री त्रिविक्रम मंदिरा समोर भाजपचे जिल्हा उप अद्यक्ष गोविंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपचे तालुका उप अद्यक्ष सुनील शिणकर,राजेंद्र भारुडे,नगरसेवक शंकर बारी,विजय धुमाळ,शरद बारी,सतीश बारी,श्री कृष्ण चौधरी,हभप कडोबा माळी, हभप रामेश्वर महाराज व महिला मास्क,रुमाल बांधुन उपस्थित होते.







Comments