top of page

*श्री. छत्रपती शिवाजी क्रीडा सांस्कृतिक मंडळ शेंदूर्णी व जळगाव जिल्हा तायक्वोंदो असोसिएशन यांच्या तर

  • Writer: CT India News
    CT India News
  • Nov 18, 2021
  • 1 min read

ree

*श्री. छत्रपती शिवाजी क्रीडा सांस्कृतिक मंडळ शेंदूर्णी व जळगाव जिल्हा तायक्वोंदो असोसिएशन यांच्या तर्फे कमांडो ट्रेनिंग कॅम्पचे आयोजन*

. छत्रपती शिवाजी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ शेंदूर्णी तालुका जामनेर व जळगाव जिल्हा तायक्वोंदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवतरुण व होतकरु मुलांसाठी कमांडो ट्रेनिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.


या कमांडो ट्रेनिंग कॅम्पचे आयोजन करण्यामागचा हेतू हाच की आजच्या तरुणांमध्ये व्यायामाची आवड कमी होत आहे. तसेच आजकाल धावपळीच्या जीवनात आत्मरक्षणासाठी तसेच विविध ठिकाणी भरतीसाठी कराटे सारखी विद्या गरजेची असल्याने तरुण मुलांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण कमी होऊन व्यायामाची आवड लागून प्रकृती व आरोग्य सुदृढ राहण्यासाठी या कॅम्पचे आयोजन केले जात असते.संस्थेतर्फे घेतला जाणारा हा २१ वा कॅंप असुन १९९४ पासुन या ठिकाणी कॅंपचे आयोजन केले जाते.


हा कमांडो ट्रेनिंग कॅम्प दिनांक १९ नोव्हेंबर शुक्रवार २०२१ पासून ते २३ नोव्हेंबर मंगळवार २०२१ या कालावधीत पाच दिवसासाठी आयोजित करण्यात आला आहे. या ट्रेनिंग कॅम्प मध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून सेन्साई माननीय मा. श्री. श्रीकृष्णा चौधरी सर (ब्लॅक बेल्ट थर्ड डॅन) महिला प्रशिक्षक कु. लोचना चौधरी ,(नॅशनल गोल्ड मेडलिस्ट) तसेच सह प्रशिक्षक म्हणून मा. करीम देशमुख सर सोयगाव मा.श्री. हरिभाऊ राऊत सर पहूर हे असणार असून मुख्य मार्गदर्शक म्हणून जळगाव तायक्वोंदो असोसिएशनचे मा.श्री. अजित घारगे सर हे असणार आहेत.


हा कमांडो ट्रेनिंग कॅम्प सोयगाव तालुक्यातील निसर्गरम्य वातावरणात असलेल्या गलवाडा धरण परिसरात होणार असून या कॅम्पमध्ये सहभागी होणार यांनी ९६८९७९५७३३, ९४०३९८८२०२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून वेळीच नावनोंदणी करुन घ्यावी म्हणजे प्रशिक्षणार्थी इच्छुकांची संख्या लक्षात घेऊन तशी व्यवस्था करणे सोईस्कर ठरेल. तरी इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Comments


bottom of page