शिरोली पुलाची येथे उद्या पासून 28 -08-2020 पासून सलग पाच दिवस गाव बंद ठेवण्यात येणार आहे
- CT INDIA NEWS

- Aug 28, 2020
- 1 min read

शिरोली पुलाची येथे उद्या दिनांक 28-08-2020 पासून सलग पाच दिवस पूर्ण गाव बंद ठेवण्यात येणार आहे.
वार्ताहार- *CT INDIA NEWS - धनंजय प्रकाश सुतार (शिरोली पुलाची)
शिरोली पुलाची या गावांमध्ये कोरोना रुग्णांची वाढत्या संख्येची गांभीर्याने दखल घेऊन रात्री उशिरा दक्षता समितीची ऑनलाइन बैठक घेऊन, शुक्रवारपासून सलग पाच दिवस संपूर्ण गाव बंद करण्याचा निर्णय या ऑनलाईन मीटिंगमध्ये दक्षता समितीने निर्णय घेतला आहे.
गेले पंधरा दिवसापासून पुलाची शिरोली या गावात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या पाहता सध्या गावात 129 कोरोना संसर्ग रुग्ण आढळले आहेत. तसेच यामध्ये वेळेत उपचार न झाल्यामुळे पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ही गावाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी व गंभीर बाब आहे. म्हणून याबाबत दक्षता समिती सदस्य व शासकीय अधिकारी यांनी याचा गांभीर्याने विचार करून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन करण्यास मान्यता दिली आहे. यावेळी लोकनियुक्त सरपंच मा श्री शशिकांत खबरे यांनी लॉकडाऊन बाबत अशी घोषणा केली आहे.
या पाच दिवसांच्या कालावधीत गावामध्ये दवाखाना, औषध दुकाने, व दूध संकलन, सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. याव्यतिरिक्त कोणतेही व्यवहार किंवा व्यवसाय बंद करण्याचे जाहीर केले आहे.
यासाठी सर्व नागरिक व्यवसायिक उद्योजक संस्था व प्रतिनिधी यांनी सहकार्य करावे असे आवाहन लोकनियुक्त सरपंच मा श्री शशिकांत खवरे यांनी केले.
या ऑनलाईन चर्चेमध्ये गावातील माझी जि प सदस्य महेश चव्हाण ग्राम विकास अधिकारी ए एस कठारे वैद्यकीय अधिकारी डॉ जेसिका अँण्डस तलाठी निलेश चौगुले तसेच सदस्य श्री प्रकाश कौदाडे श्री बाजीराव पाटील श्री सतीश पाटील श्री मुकुंद नाळे श्री बाबासाहेब कांबळे श्री उत्तम पाटील, श्री जोतीराम पोरलेकर व पत्रकार सहभागी झाले होते.







Comments